[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
CES 2024 : कंज्युमर इलेक्ट्रॉनिक (Smart laptop) शोमध्ये (CES 2024) लेनोवोने एक (Laptop) असा लॅपटॉप लॉंच केला आहे जो Android आणि विंडोज दोघांवर काम करू शकतो. म्हणजेच इथे विंडोज 11 पण काम करेल आणि तुम्ही Android OS ची मजा पण घेऊ शकता. याला तुम्ही टू-इन-वन लॅपटॉपदेखील (Two In One Laptop) म्हणू शकता. कंपनीने एका इव्हेंट मध्ये Thnikbook plus Gen 5 Hybrid लॉंच केलं आहे. जर तुम्ही याला लॅपटॉप सारखं वापरणार असाल तर विंडोज 11 वर हे एका सामान्य लॅपटॉप सारखं काम करेल. मात्र तुम्ही याचा वापर टॅबलेटच्या पद्धतीने करणार असाल तर अँड्रॉइड 13 वर चालणारे टॅप सारखे ते काम करेल. तुम्हाला (Laptop)आता प्रश्न पडला असेल की हे कसं काय होऊ शकतं? खरंतर त्याच्यामध्ये एक डिटेचेबल स्क्रीन मिळते. अर्थात तुम्ही लॅपटॉपला स्क्रीनपासून वेगळा करू शकणार आहात.
स्क्रीनला वेगळं करताच टॅबलेट मोड ऑन होऊ शकतो आणि नंतर तुम्ही याचा वापर टॅप सारखा करू शकता. लॅपटॉप मोड बद्दल बोलायचं झाल्यास याच्यामध्ये इंटेल कोर 7 अल्ट्रा प्रोसेसर, 32 GB रॅम,1 TB SSD, आणि 75 WHr बॅटरी सपोर्ट मिळतो. टॅबलेट मोडमध्ये यात Qualcomm Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसर, 12 GB रॅम ,आणि 256 GB इंटरनल स्टोरेज सोबत 38 WHr बॅटरी सपोर्ट मिळतो.डिवाइस 14 इंच 2.8K OLED स्क्रीन सोबत येतो.
किती असेल किंमत?
किंमतीबद्दल बोलायचं झालं तर लेनोवोने सांगितले आहे की, Thinkbook Plus Gen 5Hybrid US मध्ये 2024 च्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये विक्रीसाठी तो उपलब्ध होईल. याची किंमत 1,999 डॉलर म्हणजेच जवळजवळ 1,66,009 रुपये एवढी असेल. मात्र भारतामध्ये हे डिव्हाईस केव्हा येईल याची माहिती अद्यापही समोर आली नाही.
CES 2024 इव्हेंटमध्ये स्मार्ट कमोड लाँच
या अगोदर CES 2024 इव्हेंटमध्ये Kohler ने स्मार्ट कमोड लॉंच केलं होतं. यात तुम्हाला कोणतेही काम करण्याची गरज नसते तर तुम्ही अलेक्सा कडून तुमची सगळी काम करून घेऊ शकतात. कमोड सोबत तुम्हाला एक रिमोट देखील मिळतो जो 2 यूजर्सच्या हिशोबाने सीट ला ऍडजेस्ट करण्याची सुविधा देखील देतो. यात तुम्ही सीटचे टेंपरेचर, जेटचा प्रेशर,आणि मोड बदलू शकता.
इतर महत्वाची बातमी-
Smart Toilet Seat: स्मार्टफोन, स्मार्ट टिव्हीनंतर आता स्मार्ट कमोडही, आता Alexa करणार काम, काय आहे वैशिष्ट्ये?
[ad_2]