Ayodhya Ram Mandir News Sarvajink Sutti Goa Up 22 January School College Close Ram Mandir Inauguration

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ram Mandir Inauguration: अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेश आणि गोव्यामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे . 22 जानेवारी रोजी गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आणि शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वी याबाबतचा निर्णय घेतला होता. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत आज घोषणा केली आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिर सोहळ्यानिमित्ताने महाराष्ट्रातही सरकारी सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील भाजप नेत्यानेही केली आहे. राज्य सरकारकडून याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. 

 

22 जानेवारीला गोव्यात शासकीय सुट्टी –  

 

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी 22 जानेवारी रोजी गोव्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. राम मंदीर सोहळ्याच्या निमित्ताने गोव्यात 22 जानेवारीला सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सर्व शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून ही घोषणा करण्यात आली. देशात सर्वत्र दिवाळी उत्सव साजरा करावी, यासाठी गोवा सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आणि शाळेना सुट्टी जाहीर केल्याचं सांगण्यात आलेय. 

 

महाराष्ट्रातही सुट्टी जाहीर करा – भाजप आमदाराची मागणी 

 

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने राज्यामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी भाजप आमदार प्रवीण पोटे यांची केली आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून 22 जानेवारीला सरकारी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राम मंदिर सोहळ्याला दिवाळीचे स्वरूप दिले असल्याने राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हा सोहळा पाहता यावा म्हणून  शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी पोटे यांनी केली आहे.  

 

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आनंदाचा शिधा –

 

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 22  जानेवारी पासून साखर, खाद्यतेल, चनाडाळ, रवा, मैदा आणि पोहे या 6 वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना देण्यास महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कु़टुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल, चणाडाळ, रवा, मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे या सहा वस्तूंचा समावेश असलेला संच “आनंदाचा शिधा” म्हणून वितरित करण्यात येणार आहे. या वितरणाकरीता येणाऱ्या 549.86 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.

[ad_2]

Related posts