IND Vs AFG Fuming Rohit Sharma Vents Out Anger At Shubman Gill After Terrible Run Out

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rohit Sharma Video : पहिल्या टी 20 सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा सहा विकेटनं पराभव केला. शिवम दुबे याने अष्टपैलू खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पण 159 धावांचा पाठलाग करताना भारताला पहिल्याच षटकात धक्का बसला अन् रोहित शर्मा चांगलाच खवळला. रोहित शर्मा याला एकही धाव काढता आली नाही. रोहित धावबाद झाला, नॉनस्ट्राईकला असलेल्या शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये ताळमेळ दिसला नाही. त्यामुळे रोहित शर्मा चांगलाच खवळलेला दिसला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

जवळपास दीड वर्षानंतर रोहित शर्मा टी 20 च्या मैदानात परतला होता. कर्णधार म्हणून रोहित शर्मा याने प्रभावी कामगिरी केली. पण फलंदाजीत त्याला काहीच करता आले नाही. शून्य धावसंख्येवर तो धावबाद झाला. पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रोहित बाद झाला. रोहितने  मिड ऑफच्या दिशेने चेंडू मारला. नॉन स्ट्राईकला असलेल्या शुबमन गिल चेंडूकडे पाहत बसला, तोपर्यंत रोहित क्रिज सोडून दुसऱ्या बाजूला आला होता. इब्राहिम जादरानने चेंडू लगेच यष्टिरक्षक रहमनुल्लाह गुरबाज याच्याकडे फेकला अन् रोहित बाद झाला. पण रोहित तंबूत जाताना प्रचंड संतापलेला दिसला. त्याने शुबमनला मैदानावर खडे बोल सुनावले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय.  

भारतानं मोहालीच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात अफगाणिस्तानचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला. भारतानं या विजयासह तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मुंबईच्या शिवम दुबेचं नाबाद अर्धशतक भारताच्या या विजयाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. त्यानं 40 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 60 धावांची खेळी उभारली. शिवम दुबेनं अफगाणिस्तानच्या डावात एक विकेटही घेतली, हे विशेष. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 20 षटकांत पाच बाद 158 धावांत रोखलं होतं. भारताकडून मुकेश कुमार आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर भारतानं १७17 षटकं आणि तीन चेंडूंमध्ये विजयासाठीचं 159 धावांचं लक्ष्य गाठलं.



[ad_2]

Related posts