National Youth Festival 2024 Prime Minister Narendra Modi Gave Three Advices To The Youth At Nashik Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi National Youth Festival Nashik Speech : मेड इन इंडिया (Made in India) उत्पादनाचा उपयोग करा, मद्यपानापासून दूर राहा, ड्रग्जच्या (Drugs) आहारी जाऊ नका, आई बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा, असा मोलाचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi Nashik visit) यांनी युवकांना दिला.

नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाला नरेंद्र मोदी आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले की, माझ्या युवा सहकाऱ्यांनो, आपल्या देशातील ऋषी मुनींपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांनी युवाशक्तीला सर्वोपरी ठेवलं. श्री अरविंदो म्हणाले, जर भारताला आपलं लक्ष्य गाठायचं असेल तर भारताच्या युवकांना एक स्वतंत्र विचाराने पुढे जावं लागेल.

दहा वर्षात तरुणाईला आकाश खुलं केलं 

आमच्या सरकारला १० वर्ष होत आहे. या काळात आम्ही पूर्ण प्रयत्न केला की युवकांना खुलं आकाश मिळावं, त्यांच्यासमोरील प्रत्येक अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोजगार, शिक्षण, स्टार्टअप, स्किल असे सर्वकाही युवकांसाठी खुलं केलं. 

२१ व्या शतकात आधुनिक शिक्षणासाठी नवं शिक्षण धोरण आणलं. युवकांसाठी आधुनिक स्किल इकोसिस्टिम सुरु होत आहे. PM विश्वकर्मा योजना, pm कौशल विकास योजना आणून तरुणांना जोडलं. नव्या आयआयटी, नव्या आयआयएम आणलं जात आहे. विदेशातही आमचे युवक कौशल्य दाखवत आहे. सरकारही परदेशात जाणाऱ्या तरुणांना ट्रेनिंग देत आहे. 

भारत जगातील टॉप 5 अर्थव्यवस्था

स्वामी विवेकानंद म्हणायचे, भारताची आशा ही भारताच्या युवकांच्या बौद्धिकतेवर, त्यांच्या विचारावर अवलंबून आहे. या दिग्गजांचं मार्गदर्शन आजही प्रेरणादायी आहे. आज भारत जगातील टॉप ५ अर्थव्यवस्था आहे. ही भारताच्या युवकांच्या ताकद आहे.आज भारत जगातील टॉप ३ इकोसिस्टिममध्ये आला आहे. 

इतिहासात तुमचं नाव नोंदवण्याची संधी

आज भारत एकापेक्षा जास्त इनोवेशन करत आहे. भारत अनेक पेटंट फाईल करत आहे. भारत आज मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे, त्याचा आधार हा युवक आहे.सहकाऱ्यांनो वेळ ही प्रत्येकाला एक संधी देते. वेळेचा हा सुवर्णक्षण आताचा अमृतकाळाचा हा कालखंड आहे. तुमच्याकडे संधी आहे, इतिहास रचण्याची, इतिहासात तुमचं नाव नोंदवण्याची. तुम्ही प्रयत्न करा, आजही आपण सर विश्वेश्वरायांच्या आठवणीत इंजिनिअर दिवस साजरा करतो. त्यांनी जे बाराव्या शतकात इंजिनिअरिंग कौशल्य दाखवलं ते आजही लाजवाब आहे.

तरुणांना मोलाचा सल्ला

मेड इन इंडिया प्रोडक्टचा वापर करा.  कोणतीही नशा करू नका. ड्रग्जपासून लांब राहा. माता, बहिणी, मुलींवर शिव्या देऊ नका, अपशब्द वापरू नका. देशातील प्रत्येक तरुण त्यांच्या निष्ठेने सशक्त आणि सक्षम भारतासाठी प्रयत्न करेल, असा मला विश्वास असल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

[ad_2]

Related posts