18th Vidrohi Sahitya Sammelan Will Begin In February 3 And 4 Inaugurated By Comic Poet Sampat Saral Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : विद्रोही साहित्य संमेलन (vidrohi sahitya sammelan) हे 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे. या 18 व्या  अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन जयपूर (राजस्थान) येथील सुप्रसिद्ध विद्रोही व्यंग कवी संपत सरल यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती देण्यात आलीये.  विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष यांनी याबद्दल माहिती दिली. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्याम पाटील, मुख्य संयोजक डॉ. लिलाधर पाटील, मुख्य समन्वयक प्रा. अशोक पवार व निमंत्रक रणजित शिंदे, डी. ए. पाटील उपस्थित होते. 

 महाराष्ट्रात विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून “विद्रोही मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येते.  आता पर्यंत  मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, नंदुरबार, सिंधुदुर्ग, धुळे ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलने आयोजित करण्यात आलीयेत. महाराष्ट्रातील आयु. बाबुराव बागुल, वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजीज नदाफ, आत्माराम राठोड, तारा रेड्डी, तुलसी परब, जयंत पवार, डॉ. आ. ह. साळुंके, उर्मिलाताई पवार आदी सर्जनशील, प्रगतीशील साहित्यिक नाटककार, कवी आदींनी संमेलनाची अध्यक्षपदे भूषवली आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्क्सवादी विचारवंत डॉ. एजाज, प्रसिद्ध शायर निदा फाजली, डॉ. उमा चक्रवर्ती, मा. सुशिला टाकभौरे, आयु. जयंत परमार, गोहार रझा, रसिका आगाशे, आदींनी विद्रोही साहित्य संमेलनांचे उद्घाटने करून विद्रोही जागरात आपला सहभाग नोंदविला आहे.

कोणत आहेत संपत सरल?

संपत सिंह शेखावत उर्फ संपत सरल, आज हे नाव जगभर  लोकशाही मुल्यांवर निष्ठा असणारा विद्रोही कवी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म 8 एप्रिल 1962 रोजी राजस्थानमधील शेखावती या गावी झाला. हास्य आणि व्यंगाच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारा विद्रोही कवी म्हणून त्यांनी जगभर आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या गावच्या शाळेतून घेतले, त्यानंतर त्यांनी जयपूर येथून उच्च शिक्षण घेतले आणि राजस्थान विद्यापीठातून बीएड केले. नंतर त्यांनी कवींमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. 

संपत सरल यांनी संपूर्ण  भारतासह यूएसए, कॅनडा, ओमान, सिंगापूर, हाँगकाँग, यूएई, थायलंड, सौदी अरेबिया आणि नेपाळ आदी विविध देशात आपले काव्य आणि मुशायरा सादर केले आहेत. समकालीन राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करणारे विद्रोही व्यंगकवी म्हणून त्यांना ओळखले जाते. आपल्या सत्य आणि निर्भिड अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. ‘ चाकी देख चुनाव की ‘ आणि ‘ छद्मविभूषण ‘ हे त्यांचे काव्य संग्रह तर  ‘हम है ना’, ‘करम धरम’, ‘चक्कर पे चक्कर’, ‘बेटा बेटी के लिए’, ही टीव्ही वरील नाटके प्रसिद्ध आहेत.

अमळनेर येथे भरवले जाणार विद्रोही साहित्य संमेलन

यंदाचे 18 वे विद्रोही साहित्य संमेलन अमळनेर, जळगाव मध्ये भरविले जाणार आहे. अमेळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमी आहे. यंदाचे हे संमेलन आम्ही “ प्रेममय सत्य धर्म आणि समता, स्वतंत्र, बंधुत्व या मूल्य समर्थनार्थ ” या आधारित आहे.  धुळे रोडवरील आर. के. नगरच्या समोरील भव्य प्रांगणात हे संमेलन होणार असून दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात 3 परिसंवाद, 2 कवी संमेलने, गटचर्चा, कथाकथन, युवा मंच, बालमंच, विचार दिंडी इ. असणारी आहे.

हेही वाचा : 

PM Modi Speech Highlights In Navi Mumbai :  विरोधकांवर हल्लाबोल ते लोकांना आवाहन; नवी मुंबईतील भाषणातील PM मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

[ad_2]

Related posts