Chhagan Bhujbal OBC Sabha In Beed Maratha Reservation OBC Reservation Manoj Jarange Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Beed OBC Sabha : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी ज्या बीड (Beed) जिल्ह्यातून मुंबई (Mumbai) आंदोलनाची घोषणा केली, त्याच बीडमध्ये आज छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भव्य सभा होत आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध म्हणून हा ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आले असून, याच सभेत भुजबळ नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. बीड शहरातील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात आज दुपारी 4 वाजता ही सभा पार पडणार आहे. या सभेस भुजबळ यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नयेत आणि शिंदे समिती रद्द करा या प्रमुख मागणीसाठी आज बीड शहरात ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याच एल्गार सभेच्या निमित्ताने बीड शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर ओबीसी समाजाचे ध्वज पाहायला मिळत आहे. सोबतच, मान्यवरांच्या स्वागत कमानी आणि बॅनर देखील लावण्यात आले आहेत. सभेसाठी जिल्हा क्रीडा संकुलावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे सभेसाठी येणाऱ्या लोकांसाठी नाश्ता, जेवण आणि पिण्याच्या पाण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. तसेच, वाहनांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 

छगन भुजबळ काय बोलणार? 

ज्या बीड जिल्ह्यात जरांगे यांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केली त्याच बीडमध्ये आज भुजबळ यांची सभा होत आहे. त्यामुळे या एल्गार सभेच्या माध्यमातून छगन भुजबळ काय बोलणार, याकडे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून भुजबळ विरुद्ध जरांगे असा वाद पाहता आजच्या सभेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे भुजबळ जरांगे यांच्याबद्दल काय बोलणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 

जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने निघणार असून, मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी आपला निर्णय बदलावा असे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. तर, मुंबईत येऊन कायदा सुव्यवस्थेचा कोणीही प्रश्न निर्माण केल्यास कठोर कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. असे असतानाही मनोज जरांगे मात्र मुंबईच्या आंदोलनावर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण मुंबईला जाणार आणि उपोषण करणार असे म्हणून जरांगे म्हणाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Beed News : बीडच्या सभेला यायचं असेल तर भुजबळांनी राजीनामा देऊन यावं, ओबीसी महाएल्गार सभेला मराठा आंदोलकांचा विरोध

[ad_2]

Related posts