BJP Chandrashekhar Bawankule Slam Uddhav Thackeray On Devendra Fadnavis Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडले. “उद्धवजी फोटोग्राफी करायचे तेव्हा देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) कारसेवक होते, सात जन्म झाले तरी फडणवीसांची बरोबरी करु शकणार नाहीत, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केलाय. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. ज्यावेळी बाबरी पाडली होते, तेव्हा फडणवीसांचं वय काय होतं? असा टोला ठाकरेंनी लागवला होता. त्याला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलेय. 

फडणवीसांची बरोबरी करु शकणार नाहीत – 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,” उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस समजलेच नाहीत. माझा त्यांचा 35 वर्षांचा संबंध आहे. उद्धव ठाकरे फोटोग्राफी करायचे तेव्हा देवेंद्र फडणवीस कारसेवक होते. सात जन्म जरी उद्धव ठाकरेंनी घेतले तरी फडणवीसांची बरोबरी करु शकत नाहीत”

अटलजींचा फोटो कुठे? ठाकरेंच्या आरोपाला उत्तर – 

उद्धव ठाकरे यांनी कालची (शुक्रवार) चित्रफीत नीट पाहिली नाही. अटल सेतूचं लोकार्पण करताना सर्वत्र बॅनरवर, जाहिरातीत अटलजींचा फोटो होता. मी नेहमीच म्हणतो उद्धव ठाकरे मिडियासमोर येऊन नॅरेटीव्ह सेट करतात. मोदी यांना जगातला सर्वोत्तम नेता असं जग म्हणतं. पण मोदी यांना महान म्हणायचं फक्त पाकिस्तान आणि उद्धव ठाकरेच राहीले आहेत, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला.  

उद्धव ठाकरेंना टोला – 

काळाराम मंदिरात पुजा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपुर्तीचा 22 जानेवारी हा दिवस आहे. बाळासाहेबवरुन बघत असतील, माझा उद्धव अयोध्येत का जात नाही. कशाची अॅलर्जी माझ्या उद्धवला झाली असं ते बोलतील, असे बावनकुळे म्हणाले. 

स्टॅलीनचा मुलगा म्हटला होता की हिंदू धर्म संपवू. अशा सोबत उद्धव जी राहतात. मोदीजी किती घरंदाज आहेत, हे 2024 ला दिसेल. उरणमध्ये 90 हजार महिला मोदींना नमस्कार करायला आल्या होत्या, असेही बावनकुळे म्हणाले. मोदीजीच्या वादळात महाविकास आघाडी झाड-पत्यांसारखी उडून जाईल, असा टोलाही यावेळी बावनकुळे यांनी लगावला.

 मुंबईतील ठेवीवर काय म्हणाले ?

ठेवी विकासासाठी खर्च करावे. सरकार डिपॅाझीट करण्यासाठी नाही. जनतेच्या हितासाठी खर्च करणे ही सरकारची जबाबदारी आहे. अटल सेतुमुळे इंधनाची मोठी बचत होणार, हे पर्यावरण हिताचे आहे, असे बावनकुळे यांनी सांगितलं. 

इनकमिंग मोठं असेल – 

पुढच्या काळात महायुतीत येणाऱ्यांची मोठी रांग आहे. शिंदे, अजितदादा, आमच्याकडे येणाऱ्यांची मोठी संख्या असेल, असे बावनकुळे यांनी सांगितलं. 

भंडारा गोंदिया जागा पवार गट सोडणार

जागावाटपाबाबत केंद्रीय पार्लीयामेंट्री बोर्ड ठरवेल. जी जागा ज्याला मिळेल ती आम्ही निवडून आणू. महाविकास आघाडीत उद्धव जी दोन जागा मिळाल्या तरी ते राहतील. ते मजबूर आहेत. येत्या काळात शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची वाईट स्थिती होईल. त्यांना उमेदवारंही मिळणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितलं. 

अयोध्या निमंत्रणावर काय म्हणाले ?

 उद्धव ठाकरे यांना निमंत्रण आहे. त्यांनी जायला हवे.. त्यांची काय भावना आहे, माहीत नाही. पण देशाची भावना आहे. देशातील बच्चा बच्चा म्हणतोय. मोदीजींच्या हातून प्राणप्रतिष्ठा होतेय, असे बावनकुळे म्हणाले. खासदार, आमदारांनी सुचना  करण्याची गरज नाही. प्रत्येकजण कार्यक्रम करणार, असेही बावनकुळे म्हणाले. 

[ad_2]

Related posts