Majha Katta Popular Publisher Ramdas Bhatkal And Satyajit Bhatkal ABP Majha Katta Mumbai Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Majha Katta Ramdas Bhatkal and Satyajit Bhatkal : आपल्याला कोणी शिकवणारा नाही. आपण शिकत राहणं गरजेचं असते असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि पॉप्युलर प्रकाशकाचे रामदास भटकळ  (Ramdas Bhatkal) यांनी व्यक्त केलं. प्रश्न विचारणे हेच तत्वज्ञानाचे काम आहे. ते काम जी ए कुलकर्णी सारख्या विचारवंतांनी  केल्याचे रामदास भटकळ म्हणाले. एबीपी माझाच्या माझा कट्यावर ज्येष्ठ विचारवंत प्रकाशक रामदास भटकळ आणि त्यांचे पुत्र दिग्दर्शक सत्यजीत भटकळ (Satyajit Bhatkal)  हे दोघे आले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आमचं पुस्तक पॉप्युलर होतीलच असे नाही. कोणतंही पुस्तक छापताना किती खपेल याचा विचार मी कधीच करत नसल्याचे रामदास भटकळ म्हणाले. 

माझे वडील रामदास भटकळ यांना कोणत्याही मर्यादा नाहीत. आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीचा जास्तीत जास्त वापर करावा असे त्यांना वाटते. प्रकाशन व्यवसाय हे माझं काम नाही तर हे आनंद घेणं हे माझ काम असं त्यांना वाटत असल्याचे मत दिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी व्यक्त केले. आपण कधीही काहीही शिकू शकतो, फक्त इच्छाशक्ती हवी असते असेही भटकळ म्हणाले.  बाबांच्या (रामदास भटकळ) आमच्याकडून तीन अपेक्षा होत्या. पहिलं टाईपींग यायला हवं, दुसरी गोष्ट राष्ट्रभाषा आली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही शेतात राहिलं पाहीजे या अपेक्षा होत्या. त्यावेळी आम्ही कवी ना धो महानोर यांच्याकडे पळसखेडला गेलो  होतो असे सत्यजीत भटकळ म्हणाले. 

[ad_2]

Related posts