Megablock On All Three Lines Of The Railway Today Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी  रविवारी तीनही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’ (Megablock) असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. त्याचप्रमाणे जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या  मार्गावर वळविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द अप-डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगब्लॉक असेल. तर मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण पाचव्या आणि सहाव्या अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. 

मध्य रेल्वेवर असा असणार ब्लॉग

मध्य रेल्वेच्या मध्य मार्गावरील ठाणे- कल्याण दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक पाचव्या आणि सहाव्या अप-डाऊन जलद मार्गावर असेल. यावेळेत  धीम्या मार्गावरील वाहतूक ही नियमितपणे सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आलीये. ब्लॉकमुळे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील मेल-एक्स्प्रेस जलद अप-डाउन मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. यामुळे मेल-एक्स्प्रेस 15-20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत. रात्रकालीन ब्लॉकमुळे सीएसएमटी ते कल्याणदरम्यान रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

हार्बर मार्गावरील ब्लॉक

हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. ब्लॉकमुळे वडाळा रोड ते मानखुर्द, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी/बेलापूर/पनवेल अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते गोरेगाव लोकल वेळापत्रकानुसार धावतील. पनवेल ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. तसेच या वेळेत ठाणे मार्गाने प्रवाश्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  

त्याचप्रमाणे ब्लॉक कालावधीमध्ये पनवेल ते कुर्ला दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरुन विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम मार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलीये. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक घेणं आवश्यक असल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यत आलं आहे. 

अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक 

दरम्यान रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तसेच या प्रवाश्यांना देखील वेळापत्रक पाहूनच घरातून बाहेर पडण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलीये. तसेच या दरम्यान प्रवाश्यांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीरी देखील व्यक्त करण्यात आलीये. 

हेही वाचा : 

Mumbai Local Train : आनंदाची बातमी! नवी मुंबईकरांना दिवाळी भेट, खारकोपर आणि उरण दरम्यान लोकल सुरू करण्यास मंजुरी

[ad_2]

Related posts