Shivajirao Adhalarao Patil Challange For Shirur Lok Sabha Constituency Maharashtra Politics Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : मी लढणार, मी निवडणुकीला उभं राहणार आणि निवडूनही येणार असं म्हणत शिरुर मतदारसंघात (Shirur Lok Sabha Constituency) आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी आव्हान दिलं आहे. दरम्यान यामुळे अमोल कोल्हेंची डोकेदुखी पुन्हा वाढणार का याकडे लक्ष लागून राहिलंय. राज्याच्या राजकारणात भूकंप झाल्यानंतर मतदारसंघात बऱ्याच कुरघोडी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. शिरुर मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आहेत, पण या जागेवर शिंदे गटाकडून आढळराव पाटील इच्छुक असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्यातच आता आढळराव पाटलांनी व्यक्त केलेला हा विश्वास अमोल कोल्हेंना थेट आव्हान तर नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 

राज्यभरात 14 जानेवारी रोजी महायुतीकडून मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यावेळी आढळराव पाटलांनी मतदारसंघावर भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, तिन्ही पक्ष एकत्र येऊन या जागे संदर्भात निर्णय घेतील. ज्या पक्षाला ही जागा जाईल त्या पक्षासाठी इतर दोन पक्ष काम करतील. मी लढणार, मी निवडणुकीला उभं राहणार आणि निवडून येणार हे पूर्ण सत्य आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवारांकडून या मतदारसंघासाठी दावा करण्यात आला होता. त्यानंतर महायुतीमध्ये पुन्हा एकदा एका मतदारसंघावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. 

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकारण

अमोल कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पाडणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केल्यापासून शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे मागच्यावेळी या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे मैदानात होते. मात्र, या दोन्ही पक्षात आता दोन गट निर्माण झाले आहेत.  शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटात आणि अमोल कोल्हे शरद पवार गटात आहेत.

महाविकास आघाडीत अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, महायुतीमध्ये एकीकडे शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, दुसरीकडे अजित पवारांनी देखील याच मतदारसंघात निवडणूक लढवण्याच म्हटले आहे. मात्र,  शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटाकडून की अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 

हेही वाचा : 

MLA disqualification Case : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर 16 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता, राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टात

[ad_2]

Related posts