Pretended To Be A Bank Employee And Robbed Lakhs Of Rupees From The Bank In Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime news : पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. शहरात विविध गुन्हे घडत आहेत. गुन्हेगारांना पोलिसांची भीती आहे की नाही?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील कोंढवा येथील गर्दीच्या चौकात असलेल्या बँकेतून दिवसाढवळ्या दोन लाख रुपये घेऊन चोर पसार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अक्षय गोटे (वय 38 वर्षे, धंदा रियल इस्टेट, रा. सी 308 अलकसा सोसायटी महमदवाडी) यांनी कोंढवा पोलीस स्टेशन इथे फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दोन लाखांची रोकड बँकेत भरण्यासाठी गेला आणि तिथूनच पैसे लंपास

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय गोटे हे रियल इस्टेटचा व्यवसाय करतात. जागेच्या व्यवहारातून अक्षय गोटे याला 2 लाख रोख कमिशन मिळाले होते. आज सकाळी पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास दोन लाख रुपयांची ही रोख रक्कम घेऊन पत्नी कविता गोटे हिचे अकाऊंट असलेल्या इन्डसइन्ड बँक, ज्योती हॉटेल चौक, कोंढवा पुणे या शाखेतील अकाऊंटमध्ये जमा करण्यासाठी गेले होती. बँकेमधील पैसे भरण्याची स्लिप घेऊन त्यावर माहिती भरत असताना फिर्यादी याच्याजवळ एक अनोळखी इसम आला. त्याने फिर्यादीला मी बँकेतील कर्मचारी असून आम्हाला एटीएममध्ये पैसे भरायचे आहेत. तुमची स्लिप लवकर भरा असे सांगितले आणि हा माणूस काऊंटर येथे जाऊन तिथल्या महिला कर्मचाऱ्याशी बोलू लागला. त्यानंतर फिर्यादी पैसे भरण्याची स्लिप भरत असताना पुन्हा तो माणूस आला आणि मला पैसे द्या असं सांगितलं. तेव्हा हा व्यक्ती बँकेतील कर्मचारी असल्याचं फिर्यादीला वाटलं. त्यानंतर राहुल गोटे यांनी ते पैसे त्याला दिले आणि ते स्लिप भरु लागले.

बँकेत घडलेल्या घटनेने खळबळ

स्लिप भरल्यावर फिर्यादी राहुल गोटे जेव्हा कॅश काऊंटरवर गेले तेव्हा त्यांना तो माणूस दिसला नाही. तोपर्यंत इसम संबंधित रक्कम घेऊन लंपास झाला होता. याबाबत फिर्यादीने बँकेत चौकशी केल्यावर ती व्यक्ती बँकेतील कर्मचारी नसल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी फिर्यादीने तात्काळ पोलीस स्टेशनला भेट देत तक्रार दाखल केली आहे. दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. शिवाय या प्रकारामुळे अनेकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. अधिकचा तपास पोलीस करत आहेत. 

[ad_2]

Related posts