Chandrapur News Shocking Incident Iron Bar Penetrated A Laborer’s Lung Doctors Succeed In Saving Life After Surgery Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrapur News चंद्रपूर : सेंट्रिंग काढत असतांना एका मजुराच्या फुफ्फुसात लोखंडी सळई शिरल्याची दुर्दैवी घटना चंद्रपुर (Chandrapur) शहरात घडली आहे. नंदकुमार पंच (Nandkumar Panch) असं या 32 वर्षीय मजुराचं नाव असून जनता कॉलेज चौक (Chandrapur News) परिसरात एका बिल्डिंगचं काम करत असतांना ही दुर्दैवी घटना घडली. सेंट्रिंग काढतांना त्याचा अचानक तोल गेला आणि कॉलमची सळई त्याची छाती आणि फुफ्फुसा जवळून आरपार निघाली. अत्यवस्थ मजुराला तातडीने एका खाजगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून शस्त्रक्रियेनंतर (Surgery) मजुराचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आलंय.

आरपार घुसली लोखंडी सळई

चंद्रपूर-नागपूर रोडवरील जनता कॉलेज चौकात एका इमारतीच्या सेंट्रिंगच्या पाट्या काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान, नंदकुमार वर चढून सेंट्रिगच्या पाट्या काढत असताना त्यातील एक पाटी त्याच्या अंगावर पडली. त्यामुळे त्याचा अचानक तोल गेला आणि तो खाली कोसळला. दरम्यान त्या ठिकाणी एका कॉलमच्या निघालेल्या सळईवर पडल्याने ती सळई नंदकुमारच्या सरळ बरगड्यांमधून आरपार घुसली. त्यानंतर ही घटना लक्षात येताच इतर मजूर मदतीला धावले. त्यांनी कटरने सळई कापली आणि जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर कंत्राटदाराने त्याला मानवटकर रुग्णालयात दाखल केले.

जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश 

या दुर्घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले, नापोशी देविदास राठोड आणि त्यांची टीम रुग्णालयात पोहचली. रुग्णाची परिस्थिती बघून मानवटकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेत शस्रक्रिया केली. जखम फुफ्फुसाच्या अगदी जवळ असल्याने ही शस्त्रक्रिया अधिक गुंतागुंतीची आणि जीवाला धोका निर्माण होणारी होती. सद्यःस्थितीत नंदकुमारची प्रकृती धोक्याबाहेर असून शस्त्रक्रियेनंतर नंदकुमार जीव वाचविण्यात डॉक्टरांना (Doctor) यश आलंय.

या दुर्दैवी घटनेमुळे नंदकुमारच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. या अपघातात नंदकुमारच्या फुफ्फुसालादेखील जखम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यःस्थितीत नंदकुमारची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने नंदकुमारच्या कुटुंबियांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. 

 

हे ही वाचा :

 

[ad_2]

Related posts