Sachin Tendulkar Deepfake Video Goes Viral Master Blaster Clears Fake Advertisement Request To Report Sports News Cricket News Deepfake News Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sachin Tendulkar : भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) डीपफेकचा शिकार झालाय. मुलगी सारा आणि खुद्द सचिनचाच डिपफेक (Deepfake) व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याने (Sachin Tendulkar) याबाबत दु:ख व्यक्त केलय. सोशल मीडियावर सचिन आणि त्याची मुलगी सारा तेंडुलकर हिचा डिपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सचिनने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन हा खोटा आणि डीपफेक असल्याचे म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वी कृत्रीम बुद्धीमतेच्या (AI) मदतीने सेलिब्रिटींचे डिपफेक व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात येत होते. अभिनेत्री रश्मिका मांदना हिचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकराने जोर धरलाय. अभिनेत्रीपासून सुरु झालेला हा प्रकार आता क्रिकेटच्या देवापर्यंत पोहोचलाय. आता भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये सचिन एका अॅपचे प्रमोशन करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सचिन तेंडूलकरच्या आवाजाची डबिंग करुन एआयच्या सहाय्याने हा व्हिडिओ बनवण्यात आालाय. 

सचिनने तेंडुलकरला (Sachin Tendulkar) आपला डीपफेक व्हिडिओ व्हायरल झालाय याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्याने लिहिले की, हा व्हिडिओ फेक आहे. काही लोक तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात. मी प्रत्येकाला विनंती करतो की, हा व्हिडिओ सर्वांनी रिपोर्ट करावा. याशिवाय ज्या अॅपसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलाय. ते अॅप देखील रिपोर्ट मारावे.

सारा तेंडुलकरही झाली डीपफेकची शिकार 

काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकरही (Sara Tendulkar) डीपफेकची शिकार झाली होती. तिचा आणि भारताचा फलंदाज शुभमन गिल यांचा एक फोटो डीपफेकच्या सहाय्याने बनवण्यात आला होता. तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल एकत्र दिसत होते.  

सचिन आणि युवराज क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येणार

क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा मैदानावर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि युवराज सिंगची (Yuvraj Singh) जादू पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही स्टार्स 18 जानेवारी (गुरुवार) रोजी कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील मुद्देनहल्ली येथील सत्य साई ग्राम येथे होणाऱ्या ‘वन वर्ल्ड वन फॅमिली कप’मध्ये सहभागी होणार आहेत. एका संघाचे नेतृत्व सचिन तेंडुलकर करणार आहे, तर दुसऱ्या संघाचे नेतृत्व युवराज सिंग करणार आहे.

 

इतर महत्वाच्या बातम्या 

IND vs AFG Rohit Sharma : टीम इंडियाच्या मालिका विजयानंतर रोहितचा आनंद गगनात मावेना! युवा खेळाडूंवर केला कौतुकाचा वर्षाव



[ad_2]

Related posts