BJP Offer To Sushilkumar Shinde And Praniti Shinde Secret Explosion From Sushilkumar Shinde In Solapur Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सोलापूर : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत असून, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘मला आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत असल्याचा,’ दावा शिंदे यांनी केला आहे. विशेष म्हणजे आज संध्याकाळी 5 वाजता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेणार असून, त्यापूर्वी शिंदे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  

नेमकं काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे? 

अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे झालेल्या हूरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, ‘माझा दोन वेळा पराभव झाला असला, तरीही प्रणिती ताईला किंवा मला भाजपकडून आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही असे स्पष्टीकरण देखील यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी दिले. तसेच, आता मी 83 वर्षाचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं बरोबर आहे असं कसं म्हणणार. तसेच प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही. राजकारणामध्ये असे (पराभव) होतं राहतात. पंडित जवाहरलाल नेहरू या माणसासोबत असं झालं. मात्र, परभवाबाबतीत पंडित नेहरू म्हणाले होते की, ‘लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावे लागते. नंतर तो स्वतः चालतो. चालताना पडतो पुन्हा उठतो, पुन्हा पडतो पुन्हा उठतो. मग तो जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही’. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, आज वाईट दिवस आहेत, मात्र ते दिवस निघून जातील, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. 

[ad_2]

Related posts