( प्रगत भारत । pragatbharat.com)
Rohit Sharma Retired Out Country out Controversy: भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-20 सामना अगदी हाय-व्होल्टेज सामना ठरला होता. अटीतटीच्या या सामन्यात अखेरीस टीम इंडियानेच बाजी मारली. या सामन्यामध्ये 2 सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या. पहिली सुपर ओव्हर देखील टाय झाल्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मात्र अफगाणिस्तानच्या दोन विकेट्स गेल्या आणि टीम इंडियाचा विजय झाला. मात्र यावेळी रोहित शर्माच्या एका गोष्टीवर वाद झाल्याचं दिसून आलं.
सुपर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रिटायर्ड हर्ट झाला रोहित
या सामन्यात 121 रन्सची नाबाद खेळी करणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सुपर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर नॉन स्ट्राईकवर उभा असताना रिटायर आऊट झाला. त्याच्या जागी रिंकू सिंग फलंदाजीला आला. शेवटच्या बॉलवर विजयासाठी दोन रन्सची गरज होती. लोकांना वाटलं की, रोहितला असा खेळाडू हवा होता जो मैदानावर सहज दोन रन करून टीमला विजय मिळवून देईल. पण तसं होऊ शकलं नाही. शेवटच्या बॉलवर यशस्वीला एक रन घेता आला आणि सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली.
सुपर ओव्हरमध्ये रिंकूसोबत उतरला रोहित
त्यामुळे नियमांनुसार पहिली सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात येते. यावेळी दुसरी सुपर ओव्हर सुरू होताच कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा त्याची जोडीदार रिंकू सिंगसोबत फलंदाजीला आला. अशा परिस्थितीत रोहित दुखापतग्रस्त झाला तर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये तो फलंदाजीला कसा आला याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. जर तो रिटायर्ड झाला तर त्याला पुन्हा फलंदाजी का दिली? यावरून वाद होताना दिसला.
नियम काय सांगतो?
महत्त्वाचे म्हणजे, सुपर ओव्हर्स ही खेळाच्या नियमांसाठी अतिरिक्त परिस्थिती मानली जाते. स्पर्धा आणि स्वरूपानुसार असे नियम बदलू शकतात. तिसऱ्या टी-20 च्या प्रकरणात, आयसीसीने टी-20 फॉरमॅटसाठी जारी केलेल्या खेळाच्या परिस्थितीवरून स्थिती स्पष्ट होते. सुपर ओव्हरच्या नियमांशी संबंधित क्लॉज 22 नुसार, यापूर्वी खेळलेल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झालेल्या कोणत्याही फलंदाजाला पुढच्या सुपर ओव्हरमध्ये पुन्हा फलंदाजी करण्याची संधी मिळणार नाही.
रोहित शर्मा आऊट झाला होता का?
पहिल्या सुपर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रोहित शर्मा रिटायर्ड झाला होता, त्यामुळेच त्याला पुन्हा बॅटिंग करण्याची परवानगी देण्यात आली होती. MCC नियम 25.4.2 नुसार, एखादा खेळाडू आजारी असल्यास, दुखापत झाल्यास किंवा अपरिहार्य कारणामुळे फलंदाजी करण्यास असमर्थ असल्यास त्याला ‘रिटायर्ड – नॉट आउट’ च्या रूपात बाहेर पाठवण्यात येतं. याशिवाय, जर तो इतर कोणत्याही मार्गाने रिटायर्ड झाला असेल, तर एमसीसीच्या कलम 24.4.3 नुसार, तो विरोधी कर्णधाराच्या संमतीनंतरच असं करू शकतो.
अफगाणिस्तानच्या कर्णधाराची संमती घेतली होती?
नियमानुसार दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहित पुन्हा फलंदाजीला येण्यासाठी Ibrahim Zadran ची संमती गरजेची होती. पण अफगाणिस्तानचे मुख्य कोच जोनाथन ट्रॉटने सामन्यानंतर सांगितलं की, त्या संदर्भात टीमसाठी कोणतीही स्पष्टता देण्यात आली नव्हती. शिवाय मला काहीच माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितंय.
रोहित ‘रिटायर्ड – नॉट आऊट’ झाला
पहिल्या सुपर ओव्हरच्या शेवटच्या बॉलपूर्वी रोहित शर्माने पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. क्रिकेटच्या नियमानुसार, तो ‘रिटायर्ड – नॉट आऊट’ झाला. म्हणजेच तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. मात्र याबाबत Ibrahim Zadran ची परवानगी घेण्यात आली होती का? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय.