Nagpur Crime News Attempted Molestation 9 Year Old Girl In Rain Compartment Bathroom Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nagpur Crime News : धावत्या रेल्वेत (Railway) मुलीची छेढ काढून रेल्वे डब्यातील बाथरूममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांकडून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी रेल्वेच्या एसी कोचचा अटेंडंट आहे. विशेष म्हणजे घटना उघडकीस आल्यावर रल्वे डब्यात असलेल्या प्रवाशांनी आरोपीला जोरदार चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, या घटनेनंतर पुन्हा एकदा रेल्वेतील महिला सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. मोहम्मद मुन्नू उर्फ मुन्ना वल्द मोहम्मद (रा. बिहार) असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मंगळवारी पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधून 9 वर्षांची मुलगी आपल्या आई आणि आजीसोबत प्रवास करत होती. दरम्यान, 9 वर्षीय चिमुकली बाथरूममध्ये गेली असतांना आरोपी देखील जबरदस्तीने आतमध्ये घुसला. बाथरूममध्ये घुसून मुलीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. मुलीची छेढ काढत तिला पैशाचे आमिष देण्याचे प्रयत्न देखील केले. मात्र, मुलीने जोरजोरात आरडाओरड केल्यामुळे सहप्रवाश्यांनी बाथरूमकडे धाव घेतली आणि सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर डब्यातील प्रवाशांनी आरोपी कोच अटेंडन्टला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. 

आरोपी मागील आठ वर्षांपासून कोच अटेंडन्टचं काम करतो…

दरम्यान, नागपूर लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करत, आरोपीची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. मोहम्मद मुन्नू उर्फ मुन्ना वल्द मोहम्मद हा मागील आठ वर्षांपासून रेल्वे विभागात कोच अटेंडन्टचं काम करत आहेत. यापूर्वी त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. दरम्यान, या प्रकरणात त्याच्यावर भादवी कलम 354 सह पोक्सोअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक देखील झाली असल्याची माहिती रेल्वे पोलीस दलाच्या अधिकारी मनीषा काशीद यांनी दिली आहे. 

रेल्वे पोलिसांचे महत्वाचे आवाहन…

या घटनेनंतर रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांना महत्वाचे आवाहन देखील करण्यात आले आहे. रेल्वेने प्रवास करतांनी प्रवाशांनी लहन मुलांसोबत प्रवास करतांना आपल्या मुलांना एकटं सोडू नयेत. रेल्वेत मुलं खेळत असतील किंवा बाथरूमला जात असतील तर त्यांना एकटं सोडू नका. अनेकदा दिवसा रेल्वेचे दरवाजे उघडे असतात त्यामुळे मुलं खेळताना दरवाज्यापर्यंत जाऊ शकतात आणि अपघात होऊ शकतो. त्यामुळे मुलांसोबत प्रवास करातांनी पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Nagpur Crime: झटपट पैसे कमावण्याचे आमिष तीन व्यापाऱ्यांना भोवले; दुप्पट परतावा देतो सांगत दोन कोटींना लुटले

[ad_2]

Related posts