ACB Raids on Rajan Salavi house uddhav thackeray shiv sena leaders allegations on government

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ACB Raids on Rajan Salavi : राजन साळवींच्या घरी ACB कडून छापा, समर्थकांकडून सरकारचा निषेध

 मोठी राजकीय बातमी म्हणजे ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवींच्या एसीबी चौकशीची. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी  एसीबीनं साळवींच्या घराची तब्बल दहा तास झाडाझडती घेतली. त्यानंतर एसीबीनं त्यांना रत्नागिरी जिल्हा बँकेच्या शाखेत नेलं. तिथं त्यांची बँक खाती आणि लॉकरची चौकशी करण्यात आली. संपूर्ण चौकशीवेळी राजन साळवींच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. ठाकरेंसोबत असलेल्यांना त्रास देण्याचा सरकारचा हेतू असल्याचा आरोप राजन साळवी यांनी केलाय.

[ad_2]

Related posts