Washim news thackeray group leader kishori pednekar got darshan at poharadevi stree shakti sanvad yatra maharashtra politics marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वाशिम : ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना आज ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आलं आहे. कथित कोविड बॉडी बॅग घोटाळ्याप्रकणी किशोरी पेडणेकर यांना समन्स बजावण्यात आलंय. दरम्यान किशोरी पेडणेकर या स्त्री शक्ती संवाद यात्रेनिमिती विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज, शुक्रवार, 19 जानेवारीला ही यात्रा वाशिम (Washim)  येथे आली आसता किशोरी पेडणेकर यांनी मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवीचे दर्शन घेतले. यावेळी पोहरादेवीच्या चरणी नतमस्तक होत ‘सत्यमेव जयते’ म्हणत किशोरी पेडणेकरांनी संत सेवालाल महाराज, जगदंबादेवी, बाबनलाल महाराज,रामाराव महाराज समाधी स्थळी दर्शन घेतले. पोहरादेवीच्या चरणी नतमस्तक होताना सध्याच्या काळात राज्याची जनता ज्या कारणांमुळे होरपळून निघतेय त्यातून बाहेर पडो, सर्वांना सुख समृद्धी मिळो, ही प्रार्थना केल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. 

स्त्री शक्ती संवाद यात्रेचा विदर्भदौरा

वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. पोहरादेवी इथे जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे.  गेल्या 17 जानेवारीपासून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या महिला आघाडीने स्त्री शक्ती संवाद यात्रा काढली आहे. या यात्रेतून संपूर्ण राज्यातील महिलांशी संवाद साधला जाणार आहे. या यात्रेतून विदर्भातील विधानसभा मतदारसंघाचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान आज  किशोरी पेडणेकर यांना  ईडीकडून समन्स बजावण्यात आलं असून किशोरी पेडणेकर यांना 25 जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे किशोरी पेडणेकर या चौकशीला हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

शुक्रवार 19 जानेवारी रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांना देखील समन्स बजावण्यात आलंय. मागील अनेक दिवसांपासून याचसंदर्भात किशोरी पेडणेकर यांची चौकशी देखील सुरु होती. त्यामुळे आता यावर किशोरी पेडणेकर या काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या दोन्ही नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याने महाविकास आघाडीचे नेते पुन्हा एकदा ईडीच्या रडावर आल्याचं पाहायला मिळत आहे. याबत किशोरी पेडणेकरांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून समन्स हाती आल्यावर आपण त्यावर भाष्य करू, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. त्या वाशिम येथे बोलत होत्या. 

काय आहे प्रकरण?

किशोरी पेडणेकरांनी डॉ. हरिदास राठोड (डेप्युटी डीन, केंद्रीय खरेदी विभागाचा अतिरिक्त कार्यभार) यांना व्हीआयपीएलकडून 1200 बॉडी बॅग खरेदी करण्यासाठी 16 मे ते 7 जून 2020 या कालावधीत प्रत्येकी 6 हजार 719 रुपयांना विकत घेण्यास भाग पाडल्याचा तपासयंत्रणेनं आरोप केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नुकताच पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साल 2020 मध्ये किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानंच पालिका अधिकाऱ्यांनी या बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये आहे. 

वाढीव भावानं ही खरेदी केल्यानं या व्यवहारातील टक्केवारी आरोपींना मिळाल्याचा संशय असून, त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी पेडणेकर यांच्यासह वेदांत इनोटेकचे (व्हीआयपीएल) संचालक आणि कंत्राटदार तसेच वरिष्ठ अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांच्यासह पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आलं आहे.

हेही वाचा : 

Kishori Pednekar : आधी रोहित पवार, आता किशोरी पेडणेकर, एकाच दिवशी महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांना ईडीचं समन्स

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts