विराटच्या इगोशी खेळणार अन् विकेट घेणारच, इंग्लंडच्या गोलंदाजाचा किंग कोहलीला इशारा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs ENG : भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरोधात (IND vs ENG test) पाच सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड (IND vs ENG ) यांच्यामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला साहेबांकडून इशारा मिळाला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याने विराट कोहलीला इशारा दिलाय. कसोटी मालिकेत विराट कोहलीविरोधात खास प्लॅन केल्याचा दावा रॉबिन्सन यानं केलेाय. कोणत्याही स्थितीत विराट कोहलीची विकेट घेणारच, असा दावा रॉबिन्सन याने केलाय.

ओली रॉबिन्सन याने विराट कोहलीला सर्वोत्तम क्रिकेटर असल्याचे म्हटलेय. रॉबिन्सन म्हणाला की, "तुम्हाला नेहमीच सर्वोत्तम क्रिकेटपटूविरुद्ध खेळायचं असतं. प्रत्येक गोलंदाजाचं हे स्वप्नच असतं. सर्वोत्तम खेळाडूची विकेट घेण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाज करत असतो. विराट कोहली हा त्या खेळाडूंपैकी एक आहे."

विराटच्या इगोशी खेळणार रॉबिन्सन -

रॉबिन्सन याने विराट कोहलीच्या इगोशी खेळण्याबाबत वक्तव्य केलेय. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रॉबिन्सन म्हणाला की, "विराट कोहलीचा इगो खूप मोठा आहे. त्याच्या ह्याच इगोसोबत खेळण्याची प्लॅन आखला आहे. भारतात विराट कोहलीच्या इगोसोबत खेळणं अधिक रोमांचक असेल. विरा कोहली मायदेशात खेळत असून येथे तो धावा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. याआधीही आमच्यात अशा प्रकारची (चेंडू आणि बॅट) भांडणे झाली आहेत. यासाठी मी तयार आहे."

साहेबांचं बॅझबॉल क्रिकेट सुरुच राहणार –

भारताविरोधात मालिका जिंकण्यासाठी इंग्लंडच्या बॅझबॉल प्लॅनिंगमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. इंग्लंडकडून याबाबत स्पष्ट करण्यात आलेय. मागील दोन वर्षांत बॅझबॉल क्रिकेटमुळे इंग्लंड संघाला मोठं यश मिळालं आहे. भारताविरोधात मालिका जिंकण्यासाठी बॅझबॉल महत्वाचं ठरेल, असे इंग्लंडचं म्हणणं आहे. इंग्लंड भारतात 2012 मध्ये मालिका विजय मिळवण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर 2021 मध्ये फक्त पहिला कसोटी सामना जिंकता आला होता, त्यानंतर मालिका 1-3 ने गमावली होती.

इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया  -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान.

पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ -

बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स एंडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक –

पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)

[ad_2]

Related posts