मोठी बातमी! ‘जरांगेंशी चर्चा न करण्याबाबत सरकारमध्ये एकमत’; जरांगे-सरकारमधील तणाव वाढला?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange Mumbai March : मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि सरकारमधील तणाव वाढला असल्याची शक्यता आहे. यापुढे सरकारने मनोज जरांगेंशी चर्चा करु नये असे सरकारमध्ये एकमत होताना दिसतंय, अशी सरकारमधील सूत्रांची माहिती आहे. प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असताना जरांगेंच्या बदलत्या मागण्यामुळे सरकारमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे. कुणबी नोंदी सापडत असताना, तसंच पुढच्या महिन्यात अधिवेशन बोलावलं असताना जरांगेंचा मोर्चा कशासाठी? असा सवाल विचारला जातोय. त्यामुळे सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. 

मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागावा यासाठी सरकारकडून सतत प्रयत्न केले जात आहे. अशात जरांगे यांच्या मागण्या बदलत असल्याने सरकारमध्ये नाराजी असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे यापुढे मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा न करण्याच्या मुद्द्यावर सरकारमधील काही मंत्र्याचे एकमत झाले असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. 

आमच्याकडून देखील चर्चेचे दारे बंद…

मनोज जरांगे यांच्या मागण्या बदलत असल्याने सरकारमध्ये त्यांच्या सोबत चर्चा करण्याबाबत नाराजी आहे. दरम्यान, यावर मनोज जरांगे यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. सरकारकडून चर्चेचे दार बंद केले जात असतील, तर आमच्याकडूनही चर्चेचे दार आजपासून बंद झाली आहे. त्यांना काय करायचं करू द्या, आता आम्ही देखील चर्चा करत नाही. त्यांना आमच्या लेकरांचा जीव घ्यायचाच असेल, तर मग आम्ही देखील चर्चा करत नाही आणि मुंबईत आंदोलन करणार आहे असं  जरांगे म्हणाले आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts