Manoj Jarange criticized eknath shinde government over Maratha reservation Manoj Jarange Mumbai march Today second day Maratha Reservation Mumbai Rally eknath shinde marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या पायी दिंडीचा आज दुसरा दिवस असून, जरांगे काही वेळापूर्वी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, यावेळी पाथर्डीजवळ मनोज जरांगे यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. आम्हाला सरकराने धमक्या देऊ नयेत आणि मरायला भीत नाही. आरक्षण कसं मिळत नाही हे आता मुंबईत आल्यावर पाहतो, असे जरांगे म्हणाले. 

पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की,“मराठा आरक्षणाचा लढा आता शेवटच्या टप्प्यात आहे. 60-70 वर्षापासून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नव्हता. मात्र, आता 54 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. सरकारला आतापर्यंत सात महिन्याचा वेळ दिलाय, तरीपण सरकार वेळ पाहिजे म्हणत आहे. मग आता काय दोन-तीन वर्ष घेतात?, तुम्ही आरक्षण कसे देत नाही हे मी मुंबईत आल्यावर पाहतो. तुमच्यात एकमत नाही, हे आम्हाला नाही सांगायचं, असे जरांगे म्हणाले. 

गोळ्या घातल्या तरीही एक इंच सुद्धा मागे हटणार नाही.

तर, आम्हाला धमक्या द्यायच्या नाहीत. आम्ही मराठा समाजाचा संघर्ष उभा केलाय, तुमच्यात एकमत आहे का नाही हे माहिती नाही. आता मराठे एक तासही तुम्हाला वेळ देणार नाहीत. आता ते डाव टाकतील, त्यात त्यांना यश येऊ द्यायचं नाही. मी पुन्हा येईल का नाही माहिती नाही. पण आपल्या मुलाला नाही तर कोणालाच नाही. मला गोळ्या घातल्या तरीही एक इंच सुद्धा मागे हटणार नाही. पहिल्या दिवशी जी ताकद होती आपल्याला कायम ठेवावी लागेल, असे जरांगे म्हणाले.

क्युरेटीव्ह पिटीशन ओपन कोर्टात वाचलं जाणार नाही.

मागासवर्ग आयोग नेमला ते होत राहील, ते आरक्षण वेगळं आपण म्हणतो ते वेगळं आहे. ते म्हणतात टिकणार आरक्षण देऊ, मग हे काय उठणार आरक्षण आहे का?, क्युरेटीव्ह पिटीशन ओपन कोर्टात वाचलं जाणार नाही. ते आरक्षण 50 टक्क्याच्या वर आहे, आणि अपना मागत असलेलं 50 टक्क्यांच्या आत आहे, असे जरांगे म्हणाले. 

बाप-लेकाची भेट…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानुसार जरांगे हे कालपासून पायी दिंडी घेऊन मुंबईकडे निघाले आहे. यावेळी काल रस्त्यात त्यांचे मुलं आणि पत्नी देखील दिंडीत सहभागी झाले होते. मुलांची भेट घेतल्यावर जरांगे भावूक झाले होते. तर, आज त्यांच्या जन्मगावी मातोरीत त्यांचे वडील त्यांना भेटले. यावेळी मनोज जरांगे यांनी वडिलांचे पाय धरत आशीर्वाद घेतला. तर, रावसाहेब जरांगे यांनी देखील मुलाला आशीर्वाद देत, ‘त्याने हेच काम करत जनतेचे कल्याण करावे. सरकारने शपथ खाल्ली आहे, त्यामुळे आरक्षण देतील, आरक्षण दिल्याशिवाय राहत नाहीत, असे मनोज जरांगे यांचे वडील म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मूळची भूमिका मान्य झाली आहे; दीपक केसरकरांचं वक्तव्य

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts