23 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 च्या पात्रता तारखेच्या आधारे मतदार यादीचे छोटे पुनरिक्षण वेळापत्रक जाहीर केले आहे. या कार्यक्रमानुसार मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दीची तारीख 22 जानेवारी 2024 (सोमवार) निश्चित करण्यात आली होती.

तथापि, राज्य सरकारने 19 जानेवारी 2024 रोजीच्या अधिसूचनेनुसार सोमवार, 22 जानेवारी 2024 हा श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने 19 जानेवारी 2024 रोजीच्या आपल्या पत्राद्वारे राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांची अंतिम तारीख 23 जानेवारी 2024 (मंगळवार) रोजी करण्याचे निर्देश दिले आहेत.

भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करून विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर नवमतदार नोंदणी, मृत नाव वगळणे, नावात दुरुस्ती ९ डिसेंबरपर्यंत करण्यात आली. त्यावर २६ डिसेंबर पर्यंत कार्यवाही करण्यात आली.

यंदा जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाकडून नव मतदारांना नोंदणीसाठी शाळा महाविद्यालय स्तरावर मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत ४० ते ४५ हजार मतदार वाढणार असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय मयत व स्थलांतरित नागरिक यादीतून कमी होणार आहेत.


हेही वाचा

मुंबई महोत्सव 2024 सह काला घोडा आर्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन

[ad_2]

Related posts