Manoj Jarange said After Maratha Reservation Ajit Pawar takes hug Mumbai March Mumbai rally marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange On Ajit Pawar : मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणाऱ्या अजित पवारांवर (Ajit Pawar) पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांनी हल्लाबोल करत खोचक टोलाही लगावला आहे. अजित पवार आरक्षण घेऊन आल्यास मी त्यांच्या गळ्यातच उडी मारून चीपकतो, असे जरांगे म्हणाले. 

दरम्यान यावेळी बोलतांना म्हणाले की, “अजित पवारांना म्हणावं एकदा या तरी, सात महिन्यांत एकदाही आले नाही. तुम्ही मराठ्यांच्या लेकरच्या बाजूने बोलला पाहिजे. मी कोणालाही भेटायला तयार आहे. आरक्षण घेऊन आले की गळ्यात उडीच हाणतो. अजित पवारांना कारवाई करू म्हणायची गरज काय होती? त्यांनीच काडी लावून दिली. मात्र, अजित पवार आरक्षण घेऊन आले की मी त्यांच्या गळ्यातच उडी मारेल, असा चिपकुन बसेल निघणारच नाही, असेही जरांगे म्हणाले. 

मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्याचा तिसरा दिवस…

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहे. त्यासाठी जरांगे 20 जानेवारीला आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे पायी दिंडी घेऊन निघाले आहेत. त्यांच्या याच आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. सकाळी 11 वाजेच्या सुमारास जरांगे हे पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत असणाऱ्या मराठा आंदोलकांची संख्या वाढत आहे. तर, अनेक आंदोलन थेट 26 जानेवारीला मुंबईत दाखल होणार आहे. तर, आणखी तीन दिवसांचा  प्रवास केल्यावर जरांगे मुंबईत दाखल होणार आहे. 

मनोज जरांगे राम मंदिरात दर्शन घेणार   

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान, आज शहराजवळील भिंगार गावातील राम मंदिरात मनोज जरांगे आरती करून दर्शन घेतील. याच निमित्ताने ते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आपला सहभाग नोंदवणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maratha Reservation : मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांच्या सर्वेक्षणासाठी सहकार्य करा;BMC चे मुंबईकरांना आवाहन

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts