Shiv Sena MLA Disqualification case hearing in Supreme Court Notice issued to Eknath Shinde direction to submit statement in two weeks Maharashtra Politics detail marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रता (Shivsena MLA Disqualification Case) प्रकरणावर निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाकडून (Thackeray Group) पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीये. दरम्यान या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी करण्यात आली असून यावेळी सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नोटीस जारी केली आहे. तसेच त्यांना दोन आठवड्यात म्हणणं सादर करण्याचेही निर्देश दिलेत. त्याचवेळी सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी तुम्ही उच्च न्यायालयात का जात नाही, असा सवाल देखील केला. यावर ठाकरे गटाकडून युक्तिवाद करत कपिल सिब्बल यांनी त्यासाठी बराच वेळ जाईल असं म्हटलं. 

शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेना देत कोणत्याही गटाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटातील आमदाराला अपात्र केलं नाही. दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाने शिंदेंना नोटीस जारी केली असल्यामुळे राहुल नार्वेकरांचा निकाल अडचणीत तर नाही ना येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर शिंदे गटाकडून भरत गोगावले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच ठाकरे गटाकडून सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला त्यांचं म्हणणं सादर करण्याचे निर्देश दिलेत. 

सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय झालं?

राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाने पुन्हा याचिका दाखल केली होती. त्यानंतर यावर सुनावणी घेत सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, तुम्ही उच्च न्यायालयातच जा, पण यासाठी बराच अवधी लागेल, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला नोटीस जारी करत असल्याचं म्हटलं. त्यानुसार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 39 आमदारांना नोटीस जारी करण्यात आली. तसेच या आमदारांना दोन आठवड्यात त्यांचं म्हणणं सादर करण्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होईल. तारीख नंतर कळणार असली तरीही फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं वकिल सिदार्थ शिंदे यांनी म्हटलं.

दरम्यान आता शिंदे गटाच्या आमदारांनी या नोटीशीला उत्तर दिल्यानंतरच या प्रकरणाची सुनावणी कुठे करायची यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या निकालाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातच सुनावणी होणार की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयात वर्ग करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हेही वाचा : 

Mohan Bhagwat : राम मंदिर झालंय आता रामराज्यही आणा; प्राणप्रतिष्ठापनेनंतर सरसंघचालकांचे आवाहन

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts