Sanjay Raut mp and leader of Shiv Sena UBT criticism to BJP on Ram Mandir Inauguration event and Political issues Shiv Sena UBT Party Confernece

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut :  भाजपकडून (BJP) इंडिया आघाडीतील (I.N.D.I.A.) मतभिन्नतेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भूमिका स्पष्ट केली. इंडिया आघाडीत काही ठिणग्या उडल्या तरी एका पक्षाची हुकूमशाही असण्यापेक्षा दहा तोंडाची लोकशाही चालेल असे राऊतांनी स्पष्ट केले. शिवसेनेने एनडीएची साथ सोडून इंडिया आघाडीत सहभागी होण्याची कारणे खोलवर असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. 

शिवसेना ठाकरे गटाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राऊत यांनी ‘एबीपी माझा’सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत यांनी म्हटले की, या महाराष्ट्रवर मोगलांनी गाढवाचा नांगर फिरवला होता, शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून महाराष्ट्राला बरकत आणून दिली, तोच विचार आणि बाळासाहेब यांचा विचार आमच्याकडे आहे. तुम्ही आमचा पक्ष घेतला, चिन्ह घेतले ही पाकिटमारी आहे, आमच्याकडे ट्रेनमध्ये पाकीट मार आहेत गर्दीत घुसून पाकीट मार करतात, पाकीट मारी ने विचार घेता येत नाही जनता आमच्या बरोबर आहे असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. 

एनडीए  सोडण्याची कारणे खोलवर आहेत

संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना ही एनडीए आघाडीमधून इंडिया आघाडीत गेली. यासाठी काही कारण आहेत ती खोलवर रुजली आहेत असे सूचक वक्तव्य राऊतांनी केले. भाजपची पिढी बदलली, त्या पक्षात नैतिकता आणि विचाराचे पतन झाले, आम्ही म्हणजे देश, आम्ही म्हणजे राजकारण आमच्या पलिकडे कोणते राजकारण नाही, हुकूमशाह सुद्धा त्याच्या देशात आपण हुकूमशाह नाही हे दाखवतो असे  म्हणत मोदी-शहा यांनी 10 वर्षांत आपल्या पक्षाला तरी कुठे ठेवले, आहे  काय हा भाजप आहे का असा सवाल केला. अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य शिंदे, एकनाथ शिंदे  म्हणजे भाजप आहे का? हा जर भाजप असेल तर आम्ही ज्यांच्या बरोबर 25 वर्ष होतो त्यांना सोडले हे अभिमानने सांगतो असे म्हणत भाजपने आमच्यासोबत गद्दारी केली असल्याचे म्हटले.

वातावरण निर्मिती आम्ही केली, मोदी-शाहांमुळे काय झालं?

संजय राऊत यांनी म्हटले की, राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने देश राममय नाही, तर मोदीमय होत आहे.राम मंदिरात आमचे योगदान आहे, शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, मुरली मनोहर जोशी यांचे योगदान आहे. वातावरण निर्मिती आम्ही केली. ती काही मोदी अमित शाह यांच्यामुळे झाले नाही असेही संजय राऊत यांनी म्हटले. 

राम सत्यवचनी होता रामा पासून काय शिकला, मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करतात पण हा सत्याचा प्राण आहे. मात्र, यांचे रामायण वेगळे आहे, हा रावणाचा अहंकार आहे असल्याचे म्हणत राऊतांनी भाजपवर तोफ डागली. 
देशात लोकशाहीचा अंत होत आहे. राम लोकशाहीचा राजा होता, रामराज्य येणार ही मूळ संकल्पना महात्मा गांधी काँग्रेसची आहे असेही त्यांनी म्हटले. 

मनं स्वच्छ करा मंदिर काय स्वच्छ करताय?

संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मंदिर आधीच साफ केले होते,सार्वजनिक बांधकाम विभागाने 10-12 लाख रुपये खर्च करून स्वच्छता केली. पुन्हा तुम्ही तीच जागा स्वच्छ केली. हिंदूची मंदिरे स्वच्छच असतात ढोंग आम्हाला जमले नाही. मनं स्वच्छ करा मंदिर काय स्वच्छ करताय असा टोला लगावताना देशाच्या लोकशाही वर जळमटे लागले कलंक लागला ते स्वच्छ करा असे आव्हानही राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts