Weather Update cold wave in north india imd yellow alert in delhi up dense fog rain prediction marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IMD Weather Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, उत्तर भारतातील अनेक राज्यांसाठी थंड लाट आणि दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 ते 4 दिवस थंडीचा कडाका वाढणार असून धुक्याची शक्यताही कायम आहे.  दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या भागात तापमानात घट होताना पाहायला मिळणार आहे. कडाक्याची थंडी आणि थंड लाटेचे प्रतिकूल परिणाम शेतीवरही दिसून येत असून जनजीवनही विस्कळीत झालं आहे. दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी होऊन नागरिकांचं पहाटे घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. धुक्यामुळे ट्रेन आणि विमान उड्डाणेही उशिराने सुरु आहेत.

दाट धुक्यामुळे ट्रेन आणि विमान उड्डाणांवर परिणाम

दिल्ली-एनसीआरसाठी दाट धुक्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी दिल्लीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, यामुळे वाहतूक सेवांवर परिणाम झाला आहे. 11 गाड्या उशिराने धावत होत्या. याशिवाय विमान उड्डाणांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला. धुक्यामुळे काही विमान उड्डाणे उशिराने तर काही रद्द झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

दोन दिवस पावसाची शक्यता

आयएमडीच्या अंदाजानुसार, आज दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहारसह अनेक उत्तर भारतीय राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, पुढील 24 तासांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बांगलादेशवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे परिणामी देशासह महाराष्ट्रातही पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे.

पावसामुळे तापमानात आणखी घट

बांगलादेशावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे देशाच्या हवामानावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. बांगलादेशसह दक्षिण भारतात कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र पसरलं आहे. त्याचा परिणाम देशातील काही भागांमध्ये जाणवत आहे. पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तापमान दोन ते तीन अंशांनी घसरेल, अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या बहुतांश भागात दाट धुके पाहायला मिळेल. धुक्यामुळे रेल्वे आणि रस्ते तसेच हवाई वाहतुकीवर वाईट परिणाम झाला आहे.

पर्वतीय भागात पाऊस आणि बर्फवृष्टी

हिमाचल प्रदेशच्या मध्य आणि उंच डोंगराळ भागात पाच दिवस पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. हवामान केंद्र शिमलाने दिलेल्या माहितीनुसार, एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स 25 जानेवारीपासून आणि दुसरा 27 जानेवारीपासून सक्रिय होण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे, उंच पर्वतीय भागात किन्नौर, लाहौल-स्पीती, शिमला, सोलन, सिरमौर, मंडी, कुल्लू आणि चंबा या जिल्ह्यांतील काही भागात 25 ते 28 जानेवारीपर्यंत पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts