Wainganga River Chamorshi Gadchiroli Boat Capsized 6 dead marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

गडचिरोली  : चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीमध्ये (Wainganga River) नाव उलटल्याने सहा महिला बेपत्ता झाल्या आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून महिलांचा शोध घेतला जात आहे. पण अद्याप बचाव पथकाला यश आले नाही. स्थानिकांच्या मते, सहा महिलांचा बुडून मृत्यू झाला असेल. सहा महिला नदीमध्ये (Wainganga River) पडल्याची महिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आले आहे. चामोर्शी (Chamorshi,Gadchiroli ) तालुक्यातील गणपूरलगत (रै.) वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ही घटना घडली आहे. 

एका महिलेचा मृतदेह मिळाला –

मिळालेल्या माहितीनुसार, महिला मिरची तोडणीला निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांची नाव उलटली. नावाडी पोहून पाण्याबाहेर आला. त्याने एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण वाचवण्यात अपयश आले. एका महिलेचा मृतदेह मिळाला आहे. पाच महिलांचा शोध घेणं अद्याप सुरुच आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याशिवाय ज्या ठिकाणी नाव बुडाली त्या नदी किनाऱ्यावर गावकऱ्यांनी गर्दी केली आहे. पोलिसांकडून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. 4 तासानंतरही शोधकार्य सुरुच आहे, पण अद्याप यश मिळाले नाही.

दळणवळणाची अडचण, नावेचा सहारा – 

मिरची तोडणीसाठी मजुरांचा घेऊन जाणारी नाव उलटल्याने सहा महिला बुडाल्याची धक्कादायक घटना आज, मंगळवारी 11 वाजाताच्या सुमारास चामोर्शी (Chamorshi,Gadchiroli ) तालुक्यातील गणपूरलगत (रै.) वाहणाऱ्या वैनगंगा नदीत घडली. त्यापैकी एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून पाच महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही. गणपूर रै व परिसरातील महिला चंद्रपूर जिल्ह्यात मिरची तोडणीसाठी जात होत्या. गणपूरहून चंद्रपूरला जाण्यासाठी दळणवळणाची अडचण आहे. त्यामुळे अनेक जण वैनगंगा नदीपात्रात नावेत बसून ये- जा करतात. दरम्यान, २३ जानेवारीला सकाळी नेहमीप्रमाणे सहा महिलांना घेऊन नाव जात होती, पण ऐन मधोमध नदीपात्रात नाव उलटली, त्यामुळे त्यातील सहाही महिला पाण्यात बुडाल्या. यावेळी नावाडी पाण्याबाहेर पोहून आला, त्याने एका महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. शेवटी तिचे प्रेत आढळले. ते पाण्याबाहेर काढले असून उर्वरित पाच महिलांना शोधण्याचे काम सुरु आहे. या घटनेनंतर चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावपथकालाही पाचारण करण्यात आले आहे.   

आणखी वाचा :

मोठी बातमी! 2023 वनडे टीमची ICCनं  केली घोषणा, 6 भारतीयांना स्थान, पाकिस्तानचा एकही खेळाडू नाही 

मोठी बातमी! 2023 वनडे टीमची ICCनं  केली घोषणा, 6 भारतीयांना स्थान, पाकिस्तानचा एकही खेळाडू नाही

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts