Murtizapur Crime news In a love affair the boyfriend killed girlfriend first Then he killed ownself maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Akola Crime News : अकोला : प्रेम संबंधातील (Love Affairs) वाद विकोपाला जाऊन प्रियकराने आपल्या प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून हत्या केली आणि त्यानंतर स्वत:चंही आयुष्य संपवल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. अकोला (Akola Crime) जिल्ह्यातील मुर्तीजापुर (Murtizapur Crime News) तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. अनिल श्रीकृष्ण तायडे असं 45 वर्षीय प्रियकराचं नाव असून तो आकोट तालुक्यातील लाहेरी येथील रहिवासी आहे. या प्रकरणाचा सखोल तपास माना पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत असून 23 जानेवारीच्या भरदुपारी हा हत्येचा थरार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आधी चिरला प्रेयसीचा गळा, नंतर स्वत:लाही संपवलं

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल श्रीकृष्ण तायडे याचे माना येथील रहिवासी असलेल्या 36 वर्षीय शोभना नामक महिलेसोबत प्रेमसबंध होते. अनिल हा वर्षातून कित्येकदा शोभना हिला भेटायसाठी माना येथे येत होता. शिवाय त्यांच्यात फोनवर देखील संपर्क चालू होता. दरम्यान, यामधून या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, मधल्या काळात या दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊन त्यांच्यात वाद निर्माण झाला. कालांतराने हा वाद विकोपाला गेला. अशातच 23 जानेवारीच्या दुपारी तीन वाजताच्या सुमारास वस्तीतील इतर लोक कामावर गेले असता, वस्तीतील सुनसान वेळेचा फायदा घेत प्रियकर अनिल हा शोभनाच्या घरी आला.

त्यानंतर त्याने वाद घालत महिलेला शरीर सुखाची मागणी केली. त्यानंतर महिलेने नकार दिल्याने तो बळजबरी करू लागला. दरम्यान, त्याने स्वतःच्या अंगावरचे संपूर्ण कपडे काढून या महिलेच्या घराच्या दरवाज्याची आतील कडी लावून घेतली. या दरम्यान दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले आणि हा वाद फार विकोपाला गेला. अगोदरच संपूर्ण खुनाच्या हेतूने आलेल्या अनिलने रागाच्या भरात सोबत आणलेल्या धारदार चाकूने शोभनावर सपासप वार केले.

दोघांचाही घटनास्थळी मृत्यू

या थरारक घटनेमध्ये क्षणातच शोभना रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली.  शोभना मृत झाल्याचे समजून अनिल भयभीत झाला. त्यानंतर त्याने त्याच चाकूने स्वतःचा देखील गळा कापून स्वतःला अतिशय गंभीररित्या जखमी करून घेतले. दारम्यान त्यामध्ये अनिलचा देखील मृत्यू झाला. त्या दोघांच्या आरडा-ओरडणे बाहेरून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या लक्षात येऊन काही लोकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण, लोकांकडून दरवाजा उघडला गेला नाही. त्यानंतर घराच्या मागील लोखंडी खिडकी तोडून आत प्रवेश करत दरवाजा उघडला. त्यानंतर लोकांना आत झालेल्या खुनाचा थरार पहावयास मिळाला.

त्यानंतर या घटनेची माहिती माना पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने अकोला येथील पोलीस फॉरेन्सिक टीम, आयकर युनिट यांना बोलावून घेतले. सोबतच मुर्तीजापुर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, आणि माना पोलीस स्टेशनचे उमेश हरमकर, जय मंडावरे, पंकज, सरोदे, पंजाबराव इंगळे, इरफान, आणि  इतर सहकारी चौकशी कामात सहभागी होते. याप्रकरणी माना पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts