Madhya Pradesh Cricketer Munis Ansari Who Played For Oman After Not Being Selected In Team India; टीम इंडियात संधी न मिळाल्याने युवा खेळाडू निराश, दुसऱ्या देशातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारतामध्ये एकापेक्षा एक प्रतिभावान खेळाडू आहेत. अनेक असे टँलेन्टेड खेळाडू आहेत; जे नेहमीच भारतासाठी खेळण्याचे स्वप्न बाळगतात. त्यापैकी काही हे स्वप्न पूर्णही करतात. बाकीचे खेळाडू एकतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये नाव कमावण्याचा प्रयत्न करतात. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकलेल्या पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कधीही चमकू न शकलेल्या खेळाडूंची यादी मोठी आहे. काहींनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये हिंमत न गमावता घाम गाळला आणि आपल्याला संधी मिळण्याची वाट पाहिली, तर काही खेळाडूंच्या संयमाने प्रतिसाद दिला.
त्याचबरोबर अनेक खेळाडू देश सोडण्याचा निर्णयही घेतात. उन्मुक्त चंदशिवाय या यादीत आणखी एक युवा गोलंदाज आहे जो आता भारताऐवजी ओमानकडून खेळत आहे.

खरंतर ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत तो मुनीश अन्सारी हा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. जो सिहोर जिल्ह्यात राहतो. मुनीश सध्या ओमानकडून खेळत आहे. आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक २०१६ मध्येही तो सहभागी झाला होता. डेनिस लिली, वसीम अक्रम आणि किरण मोरे या दिग्गज क्रिकेटपटूंना आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रभावित करणाऱ्या सेहोरच्या मुनीश अन्सारीला मध्य प्रदेश क्रिकेट बोर्डाने रणजी खेळण्यासाठीही योग्य मानले नाही.

MPL साठी धनंजय मुंडे सज्ज, मराठवाड्याच्या टीम जबाबदारी; प्रॅक्टिसला जोशात सुरुवात

मुनीश अन्सारी हा त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने बराच काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली पण तरीही त्याला मध्य प्रदेशच्या रणजी संघात संधी मिळाली नाही. २००६ मध्ये, BCCI च्या वतीने, मुनीश अन्सारीची राष्ट्रीय निवडकर्त्यांनी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया प्रेसिडेंट इलेव्हन कडून दौरा करणाऱ्या इंग्लंड संघाविरुद्धच्या सराव सामन्यात खेळण्यासाठी निवड केली.

मुनीश अन्सारीने पहिल्या डावात केविन पीटरसन आणि दुसऱ्या डावात अँड्र्यू फ्लिंटॉफची विकेट घेत दोन्ही हातांनी संधीचा फायदा घेतला. त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले परंतु असे असूनही मध्य प्रदेशच्या निवडकर्त्यांनी त्याच्याकडे सतत दुर्लक्ष केले. अशा स्थितीत त्याने हताश होऊन ओमानला जाण्याचा निर्णय घेतला. त्याने २०१५ मध्ये ओमानकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, २०१६ पासून तो एकही सामना खेळलेला नाही.

[ad_2]

Related posts