Maratha Reservation News Backward Classes Commission members visit Marathwada from today review the Maratha survey ManojJarange In Pune Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईकडे (Mumbai) कूच करत असतानाच, दुसरीकडे सरकार देखील यावर तोडगा काढण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. दरम्यान, मागासवर्ग आयोगाचे सदस्य आजपासून मराठवाड्याचा (Marathwada) दौरा करणार आहेत. 23 जानेवारीपासून सुरु असलेल्या मराठा सर्वेक्षणाचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात या सदस्यांकडून आढावा बैठक देखील घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार असून, ते मराठवाड्यातील सर्वेक्षणाचा आढावा घेणार आहेत. सोबतच, आठही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वेक्षणाची माहिती घेणार आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सुमारे 32 हजार कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. त्यापैकी 15 हजार लाभार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या बैठकीत या सर्व गोष्टींचा आढावा घेतला जाऊ शकतो. 

असा असणार राज्य मागासवर्ग आयोगाचा दौरा…

  • धाराशिव : 25 जानेवारी रोजी 
  • लातूर : 26 जानेवारी  (सकाळी)
  • नांदेड : 26 जानेवारी (सायंकाळी) 
  • हिंगोली : 27 जानेवारी (सकाळी 11 वाजता)
  • जालना : 28 जानेवारी (सकाळी 11 वाजता)
  • बीड : 8 जानेवारी (दुपारी 4 वाजता)
  • छत्रपती संभाजीनगर : 29 जानेवारी (सकाळी 11 वाजता) 

मोबाईल एप्लीकेशनमध्ये तांत्रिक अडचणी

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी करावयाच्या सर्वेक्षणाला 23 जानेवारीपासून सुरवात झाली आहे. सर्वेक्षणासाठी तालुकास्तरावर तहसीलदार हे नोडल अधिकारी व नायब तहसीलदार यांना सहायक नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण पुण्यातील गोखले इन्स्टिटयुट या संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या युजर फ्रेंडली मोबाईल एप्लीकेशन प्रणालीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र, पहिल्याच दिवशी मोबाईल एप्लीकेशनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने कामकाज ठप्प पडल्याचे पाहायला मिळाले होते.

असे असणार सर्वेक्षण…

  • गाव पातळीवर प्रत्‍यक्ष सर्वेक्षणाच्‍या कामास 23 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. 
  • प्रत्‍येक प्रगणकाकडून 100 कुंटूबाना भेट देवून प्रत्‍येक घराचे सर्वेक्षण करण्‍यात येणार आहे. 
  • सर्वेक्षण झालेल्‍या घरावर मार्कर पेनव्‍दारे चिन्‍हांकन करण्‍यात येणार आहे. 
  • सर्वेक्षणाचे काम 23 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत केले जाणार असून, या अंतर्गत प्रत्‍येक कूंटूबास भेट देणार आहे.
  • प्रत्‍येक कुंटूबातील एका सदस्‍यानी घरी थांबून सर्वेक्षण करणारे प्रगणक यांना आपल्‍या कूंटूबाची अचूक माहिती देण्‍याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्‍यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Maratha Reservation Survey : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वेक्षणाचा कितपत उपयोग?; ‘या’ प्रश्नांची उत्तरं मिळेना…

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts