How Many Runs Team India Required To Save Follow On in IND vs AUS WTC Final 2023; फॉलोऑन वाचवण्यासाठी टीम इंडियाला आणखी किती धावांची गरज आहे? काय आहे नियम; जाणून घ्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन: ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगलेच तंगवले. कांगारूंचा संघ दुसऱ्या दिवशी १२१.३ षटकांवर ऑल आऊट झाला. नाबाद फलंदाज स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या दिवशी सामना सुरू होताच आपले शतक पूर्ण केले, तर ट्रॅव्हिस हेडने १५० अधिक धावा गाठल्या. दोघांनाही दुसऱ्या दिवशी मॅरेथॉन डाव खेळता आला नाही ही टीम इंडियासाठी दिलासादायक बाब होती. असे असतानाही ऑस्ट्रेलियन संघ ४६९ धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत केवळ १५१ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. अजिंक्य रहाणे २९ धावा (७१ चेंडू) आणि श्रीकर भरत ५ धावांवर (१४ चेंडू) खेळत होते.फॉलोऑन वाचवण्यासाठी किती धावा आवश्यक

फॉलोऑन वाचवण्यासाठी टीम इंडियाला आणखी किती धावा कराव्या लागतील, हा प्रश्न सध्या सर्वांच्याच तोंडी आहे. क्रिकेटच्या नियमांनुसार, ५ दिवसांच्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाकडे किमान २०० धावांची आघाडी असेल, तर तो फॉलोऑन होऊ शकतो. म्हणजेच फॉलोऑन टाळण्यासाठी भारतीय संघाने २७० धावांचा पल्ला गाठणे आवश्यक आहे. सध्या रोहित शर्माच्या संघाने ५ गड्यांच्या मोबदल्यात १५१ धावा केल्या आहेत. म्हणजेच पुढच्याच डावात फॉलोऑन टाळायचे असेल तर टीम इंडियाला आणखी ११९ धावा कराव्या लागतील. तरच फॉलोऑन खेळण्याचा धोका टळेल.

रवी शास्त्रींनी गियरच बदलला… WTC Final मध्ये पोहोचल्यावर रोहितबद्दल काय म्हणाले पाहा…

आघाडीची फलंदाजी फळी स्वस्तात बाद

स्मिथ आणि हेड खेळत असताना फलंदाजी सोपी वाटत असलेल्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना संघर्ष करावा लागला. रोहित शर्मा (१५ धावा) आणि शुभमन गिल (१३ धावा) यांनी पहिल्या सहा षटकात ३० धावा जोडत भारताची सकारात्मक सुरुवात केली. मात्र, दोघेही समान धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानेच रोहित शर्माला एलबीडब्ल्यू बाद केले. तर गिलने स्कॉट बोलँडचा एक आतील चेंडू चुकवला आणि थेट स्टंप्सवर जाऊन आदळला.

त्याचप्रमाणे चेतेश्वर पुजाराही (१४ धावा) कॅमेरून ग्रीनचा बळी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या संयमी गोलंदाजीसमोर विराट कोहलीही (१४ धावा) फार काळ टिकू शकला नाही. भारताकडून फक्त रवींद्र जडेजाने (४८ धावा, ५१ चेंडू) प्रतिआक्रमण केले. त्याने आपल्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला. पण तोही नेथन लायनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

[ad_2]

Related posts