Pune News Battle of credits in BJP Congress in Pune over Water tank ravindra dhangekar sidharth shirole

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यामध्ये काँग्रेस (congress) आणि भाजपमध्ये (BJP) श्रेयवाद (Pune News) रंगलाय आशा नगर मध्ये उभारण्यात आलेली पाण्याची टाकी आमच्या प्रयत्नातून उभी झाली असं सांगत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या हस्ते होत असलेल्या उद्घाटनाला विरोध केला. या टाकीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री आण पालकमंत्री अजित पवार आज दुपारी करणार आहेत मात्र त्याआधीच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी या टाकीचे उद्घाटन करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार कार्यकर्ते टाकीकडे जायला निघाले मात्र त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं. 

या टाकीजवळ आमदार धंगेकर आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा पोलिसांशी वाद झाला काही प्रमाणात झटापट देखील झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाला येणार का याबद्दल उत्सुकता आहे. पुण्यातील कॉंग्रेस आणि भाजपमध्ये आतापर्यंत अनेकदा क्षेयवादाची लढाई पाहायला मिळाली आहे. भाजपची सत्ता असताना अनेक विकास कामांवर लक्ष देत कामं पूर्ण करुन घेतली, असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र त्या उलट  या टाकीचं काम आम्ही पूर्ण केलं तरीही अजित पवार उद्घाटन का करत आहे?, असा प्रश्न उपस्थित करत आम्हीच टाकी उभारली असा  दावा केला जात आहे. 

भाजपचं काय म्हणणं आहे?

मार्च 2016 मध्ये या टाकीचं काम सुरु झालं होतं. त्यानंतर 2017 मध्ये लगेच महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये भाजपचे नगरसेवक निवडणून आले. 2017 ते 2022 पर्यंत टाकीचं काम पूर्ण झालं. या सहा वर्षात कॉंग्रेसची सत्ता एकच वर्ष होती. तरीही कॉंग्रेस या टाकीचं काम आम्ही केल्याचा दावा करत आहे. हा दावा साफ खोटा असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. या  टाकीसाठी साधारण 11 कोटी खर्च आला, असंही भाजपक़डून सांगण्यात आलं आहे. 

 अजित पवार उद्घाटनाला येणार का? 

आज अजित पवार पुण्यातील काही विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. त्यात आता या टाकीवरुन भाजप आणि कॉंग्रेसमध्ये श्रेयवाद सुरु झाला आहे. अनेक कॉंग्रेसचे कार्यकर्ते टाकीच्या परिसरात जमले आहेत. या परिसरात काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे अजित पवार या उद्घाटन सोहळ्याला येणार की नाही?, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र अजित पवार 3 वाजता या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : लय मोठा भाई झालास का? भाईगिरीवरुन वाद वाढला अन् मित्राच्या कानाचा थेट लचकाच तोडला; पुण्यातील घटना

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts