Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील मराठ्यांसह आझाद मैदानात गुलाल उधळणार; शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांपैकी सर्वात महत्वाची मागणी असलेल्या सगसोयऱ्यांवर आजच (26 जानेवारी) निर्णय होण्याची शक्यता आहे. सगेसोयऱ्यांच्या नोंदी करण्यासंदर्भातील अद्यादेश आजच काढला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुणबी दाखले असणाऱ्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी होती. मराठा जमाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करण्याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली. ही बैठक तब्बल साडे तीन तास चालली.

हा नवीन अध्यादेश लवकरच जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहचवण्यात येईल.बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त मुंबईमध्ये दाखल

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड विशेष विमानाने मनोज पाटील जरांगे यांना जीआर संदर्भात बोलण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत आणखी एक बैठक होणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त आर्दड आणि भांगे पोहोचतील.

मनोज जरांगे यांनी कोणत्या मागण्या केल्या?

नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या

शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या

कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा

जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा

आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा

आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे घ्या

SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या

वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या

रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही

दुसरीकडे, मागण्यांवर आज रात्रीपर्यंत बाबतीत आदेश काढावा. अन्यथा, उद्या (27 जानेवारी) दुपारी बारानंतर आझाद मैदानाकडे कूच करू असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलकांचा ताफा वाशी, नवी मुंबईत या ठिकाणी थांबला आहे. अध्यादेश मिळाला तरी आझाद मैदानाकडे गुलाल उधळण्यासाठी जाणार आणि नाही मिळाल्यास त्याठिकाणीच उपोषण करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Kunbi Caste Certificate : ‘या’ 4 जिल्ह्यात 37.94 लाखांपैकी तब्बल 15 लाख 38 हजार 475 कुणबी प्रमाणपत्रे निर्गमित! तुमच्या जिल्ह्यात किती?

[ad_2]

Related posts