Mangal Gochar 2024 Transit of Mars in Capricorn fortune of these 4 zodiac signs will get money

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mangal Gochar zodiac signs : काही ग्रह दीर्घ कालावधीनंतर राशी बदल करतात. तर काही ग्रह अल्पावधीतच राशी बदल करतात. अशातच आता यंदाच्या नवीन वर्षात मंगळ ग्रह 5 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 9:07 वाजता मकर राशीत प्रवेश करणार (Mars Transit In Capricorn 2024) आहे. मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. लाल ग्रह म्हणून ओळखला जाणारा मंगळ जेव्हा जेव्हा संक्रमण करतो तेव्हा सर्व 12 राशींवर याचा प्रभाव पडतो. मंगळाच्या मकर राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे पाहुया…

मेष

ज्योतिष शास्त्रानुसार मकर राशीत मंगळाच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ किंवा संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, ज्यामुळे तुमचे करिअर उज्वल होईल. नवीन लग्न झालं असेल तर तुम्ही दोघंही लहान सहलींवर जाऊ शकता, ज्यामुळे तुमच्यातील परस्पर समजूतदारपणा वाढेल.

कर्क 

मंगळाचे राशी परिवर्तन होताच कर्क राशींच्या लोकांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे.  या काळात नशीब तुमच्या बाजूने असण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सुख सुविधांमध्ये मोठी वाढ होऊ शकतं.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी अनपेक्षित आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होत आहे. नोकरदार लोकांना या काळात पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येऊ शकतं. स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते.

मकर 

मकर राशींच्या लोकांना समाजात मान-सन्मानासह अनेक फायदे मिळण्याची शक्यता आहे. भविष्य लक्षात घेऊन तुम्ही दीर्घकालीन उद्दिष्टे बनवून काम कराल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठा लाभ मिळू शकेल. तसेच मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. पैसे कमाई करण्याचे अनेक संधी तुम्हाला मिळू शकतात. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts