Weather Update Today IMD rain prediction in up punjab hariyana Weather Forecast cold weather in north india snowfall in jammu kashmir marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IMD Weather Updates : वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे पुन्हा एकदा देशाच्या हवामानात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात काही भागात थंडीची तीव्र लाट (Cold Wave) पाहायला मिळत असून काही भागात पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात तीव्र थंडी आणि दाट धुके जाणवत आहे, यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. दिल्लीत 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिल्लीतील दिवसाच्या तापमानात आणखी घट होऊ शकते.

दोन वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानाात बदल

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स आता भारताच्या दिशेने येत आहेत. एका वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम वायव्य हिमालयावर दिसून येत आहे आणि दुसरी वेस्टर्न डिस्टर्बन्स 31 जानेवारीच्या आसपास सक्रिय होण्याची शक्यता आहे. या दोन वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे, आम्ही पश्चिम हिमालयात पूर्वीच्या हिवाळ्याच्या हंगामापेक्षा जास्त पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची अपेक्षा करत आहे. त्यासोबतच देशात अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

उत्तर भारतात हाडं गोठवणारी थंडी

गेल्या काही आठवड्यांपासून, उत्तर भारत तीव्र आणि हाडं गोठवणारी थंडी दिसत आहे. तापमानात घट आणि दाट धुके यामुळे पुढील काही दिवस कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात आर्द्रता निर्माण झाली आहे, त्यामुळे उत्तरेकडील भागात पुढील 48 तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशाच्या उत्तरेकडे काही भागात 30 आणि 31 जानेवारी रोजी पाऊस पडेल, असं आयएमडीने म्हटलं आहे.

मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता 

आयएमडीने म्हटलं आहे की, पुढील दोन दिवसात जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टीची शक्यता आहे. 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी हिमाचल प्रदेशवर आणि 2 फेब्रुवारी उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे. तसेच, पंजाब आणि हरियाणाला तसेच आसपासच्या भागात हलक्या गडगडाटी वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

काश्मीर खोऱ्यातही पावसाची हजेरी

जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशसह प्रदेशांमध्ये 3 फेब्रुवारीपर्यंत मध्यम पाऊस किंवा हिमवृष्टी अपेक्षित आहे. 30 आणि 31 जानेवारी रोजी काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज आहे31 जानेवारीला हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts