( प्रगत भारत । pragatbharat.com)
Trigrahi Yog In Kumbh: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यामध्ये शनी सर्वात मंद गतीने फिरणारा ग्रह आहे. शनि सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत स्थित आहे. यासोबतच सूर्य आणि बुधही या राशीत प्रवेश करणार आहेत. अशा स्थितीत कुंभ राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होत आहे.
शनीने तब्बल 30 वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे. या तिन्ही ग्रहांचा संयोग 30 वर्षांनंतर होणार आहे. या दुर्मिळ संयोगाच्या निर्मितीमुळे अनेक राशींना विशेष लाभ मिळू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य 13 फेब्रुवारीला कुंभ राशीत आणि 20 फेब्रुवारीला बुध राशीत प्रवेश करतोय. कुंभ राशीमध्ये तयार झालेल्या त्रिग्रही योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे, हे पाहूयात.
मेष रास (Mesh Zodiac)
या राशीमध्ये अकराव्या घरात त्रिग्रही योग तयार होणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. परदेशात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. वडिलोपार्जित मालमत्ताच्या माध्यमातून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. आर्थिक स्थितीही मजबूत असणार आहे.
वृषभ रास (Vrishbha Zodiac)
या राशीमध्ये दशम भावात त्रिग्रही योग तयार होणार आहे. परदेशात मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकतं. यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार आहे. तुम्हाला बढती आणि प्रोत्साहन मिळण्याची चांगली संधी आहे. कामात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अनेक उत्तम संधी मिळतील. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. परदेशात व्यवसाय चांगला होईल. तुमच्या मेहनतीने भरपूर पैसे कमवाल.
मिथुन रास (Mithun Zodiac)
या राशीमध्ये नवव्या घरात त्रिग्रही योग तयार होणार आहे. तुम्हाला अपार संपत्ती मिळू शकते. नशिबाने साथ दिली तर प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांनाही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीही चांगली राहील. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी प्रवास करू शकता, जे शुभ सिद्ध होणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बरेच सकारात्मक परिणाम मिळतील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)