लक्ष द्या! ठाण्यात 1 आणि 2 फेब्रुवारीला पाणीकपात

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा आणि वागळे (काही भागात) प्रभाग समित्यांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत काटई नाका ते कल्याण फाटा या बारवी ग्रॅव्हिटी वाहिनीच्या तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार, 1 फेब्रुवारी, दुपारी 12.00 ते 2 फेब्रुवारी, 12:00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही. एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक 26 आणि 31 चा भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती आणि वागळे प्रभाग समिती, नेहरूनगर तसेच कोलशेतमधील रूपादेवी पाडा, किसन नगर क्रमांक 2 या सर्व भागांमध्ये मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत खालचा गाव २४ तास पूर्णपणे बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. पाणीटंचाईच्या काळात पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.


हेही वाचा

टाटा पॉवर कंपनीचा वीज दरात वाढ करण्याचा प्रस्ताव


वाशी एपीएमसीमध्ये हापूसची विक्रमी आवक

[ad_2]

Related posts