( प्रगत भारत । pragatbharat.com)
Kendra Tirkon Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशींमध्ये गोचर करतात. ग्रहांच्या या गोचरमुळे अनेक शुभ राजयोग तयार होताना दिसतात. ग्रहांमुळे तयार झालेल्या या गोचरचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. येत्या काळात असंच ग्रहाच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होणार आहे.
मार्चमध्ये सुरुवातीला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्या केंद्र त्रिकोणामुळे राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. परंतु यावेळी काही राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी आर्थिक लाभ आणि सौभाग्य मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया केंद्र त्रिकोण राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.
मिथुन रास (Mithun Zodiac)
केंद्र त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. शुक्र ग्रह तुमच्या राशीतून कर्म घरात जाणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळेल. आर्थिक स्थैर्य आधीच तुमच्या बाजूने आहे. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. प्रलंबित प्रकल्प मार्गी लागणार आहेत. एक मोठा व्यवसाय करार निश्चित केला जाऊ शकतो. या काळात वडिलांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील.
कर्क रास (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग अनुकूल ठरू शकणार आहे. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला विविध क्षेत्रात चांगल्या संधी मिळतील. या व्यतिरिक्त तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी प्रवास करू शकता. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहील. तुमचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे. विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. अडकलेले पैसेही परत मिळू शकणार आहेत. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळतील.
कुंभ रास (Kumbh Zodiac)
केंद्र त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. शुक्र ग्रह तुमच्या राशीतून धन आणि वाणी स्थानात प्रवेश करणार आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होणार आहे. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वातही सुधारणा दिसून येईल. नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला शुभ परिणाम मिळतील.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )