Prakash Ambedkar with MVA Loksabha seat sharing maharashtra news Special Report

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अकोला : वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर  (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi)  समावेश झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आज आपली भूमिका मांडली.  लोकसभा जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. जवळपास 40 जागांवर सर्वपक्षीयांचं एकमत झालं आहे, 8 जागांवर चर्चा सुरु आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटासह वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष महाविकास आघाडीत आहे. 

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

जागावाटपाच्या चर्चेबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, “कालच्या बैठकीत मविआचंच काही ठरलं नसल्याचं लक्षात आलं. त्यांचं ठरावं म्हणून आम्ही आमचे काही मुद्दे समोर ठेवलेत. किमान समान कार्यक्रम, मराठा आणि ओबीसी आरक्षण, दिल्लीतील शेतकरी आंदोलन असे 15 मुद्दे आम्ही कालच्या बैठकीत मांडले.

कालच्या बैठकीत जागा वाटपावर काय ठरलं याची माहिती मागितली. 2 तारखेच्या बैठकीपर्यंत जागा वाटपाचा फॉर्मुला स्पष्ट करण्याचा आग्रह केला. आम्ही आमचा इगो आड येऊ देणार नाही. वंचित बहुजन आघाडीचा अद्याप महाविकास आघाडीमध्ये समावेश झालेला नाही. जे पत्र आम्हाला दिलं आहे त्या पत्रावर फक्त काँग्रेसच्या नाना पटोले यांची सही आहे, त्यावर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची सही नाही.

 

[ad_2]

Related posts