Chhatrapati Sambhaji Nagar Police Cases filed against 500 people including Imtiaz Jaleel In case bank depositors protest marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यासह 500 आंदोलकांवर संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात सरकारी कामात हस्तक्षेप आणि दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जलील यांच्या नेतृत्वाखाली बुडालेल्या बँक आणि पतसंस्था यांच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला उग्र वळण मिळून पोलिस व आंदोलकांमध्ये झटापट झाली होती. शेवटी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराचा मारा केला होता. ज्यात अनेकजण जखमी झाले होते. त्याच प्रकरणी आता पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. 

संभाजीनगरमधील आदर्श नागरी पतसंस्थेसह विविध पतसंस्था, बँकांमध्ये पैसे अडकलेल्या ठेवीदारांनी मंगळवारी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी आंदोलकांनी विभागीय आयुक्तांच्या भेटीचा आग्रह करत लेखी आश्वासनाची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली. याचवेळी मोर्चाला उग्र वळण मिळून पोलिस व आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराचा मारा केला होता. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आता या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 500 आंदोलकांवर सरकारी कामात हस्तक्षेप आणि दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

पैसे मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही…

दरम्यान, मंगळवारी झालेल्या आंदोलनावर इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आपल्या कष्टाच्या पैशांसाठी या भोळ्याभाबड्या लोकांवर रडण्याची वेळ आली आहे. आदर्श, मलकापूरसह आदी सहकारी बँकांनी घोटाळे केले आहेत. या ठेवीदारांच्या लढ्याचं नेतृत्व केल्याने माझ्यावर अश्रुधुराचा मारा करण्यात आला. मात्र, या ठेवीदारांचे पैसे परत मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नसल्याची भूमिका जलील यांनी घेतली आहे. 

आधीच संकटात, अशात आता दंगलीचे गुन्हे…

मागील काही दिवसांत संभाजीनगर शहरात अनेक पतसंस्थांमध्ये घोटाळे झाल्याचे समोर आले आहेत. ज्यात शेकडो लोकांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. विशेष म्हणजे यात बहुतांश ठेवीदार मध्यमवर्गीय आणि सामन्या कुटुंबातील लोकं आहेत. आयुष्यभराची जमापुंजी त्यांनी बँकेत गुंतवणूक केली होती. त्यामुळे या घोटाळ्यामुळे हे सर्व लोकं रस्त्यावर आली आहेत. काहींनी तर आत्महत्या केल्याचे देखील समोर आले. त्यामुळे आपले पैसे परत मिळवण्यासाठी या ठेवीदारांचा लढा सुरु आहे. अशात मंगळवारी झालेल्या आंदोलनानंतर त्यांच्यावर दंगली सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

संभाजीनगरात ठेवीदारांच्या आंदोलनात राडा, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा; जलील आक्रमक

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts