England Announced Playing 11 For 2nd Test James Anderson Return Shoaib Bashir Debut Visakhapatnam Ind Vs Eng

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

England Playing 11 For 2nd Test Against India : पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने (IND vs ENG) भारताचा 28 धावांनी पराभव केला होता. आता भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारी रोजी विशाखापट्टनम येथे होणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाने प्लेईंग 11 ची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या संघात दोन बदल करण्यात आले आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याचं कमबॅक झालेय. तर फिरकी गोलंदाज शोएब बशीर याचं पदार्पण होणार आहे. हैदराबाद कसोटी सामन्यात पहिल्या डावात 190 धावांनी पिछाडीवर असताना इंग्लंडने 28 धावांनी विजय मिळवला होता.

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना 2 ते 6 फेब्रुवारी रोजी विशाखापट्टनमच्या  डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सकाळी नऊ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. विशाखापट्टनमची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असल्याचं बोलले जातेय. इंग्लंड संघाने पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत सध्या 1-0 ने आघाडी घेतली आहे. 

जॅक लीच याला पहिल्या कसोटी सामन्यावेळी दुखापत झाली होती, त्यामुळे तो प्लेईंग 11 च्या बाहेर आहे. त्याच्या जाही युवा फिरकीपटू शोएब बशीर याला संधी मिळाली आहे. त्याला पदार्पणाची संधी मिळाली आहे. त्याशिवाय मार्क वूड यालाही आराम देण्यात आला आहे. अनुभवी जेम्स अँडरसन याला संधी देण्यात आली आहे. इंग्लंडच्या संघात अँडरसन एकमेव वेगवान गोलंदाज आहे. पहिल्या कसोटी सामन्यातही इंग्लंड फक्त एका वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरला होता.

 
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ – 

जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन. 

दुसऱ्या कसोटीसाठी संभाव्य टीम इंडिया 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंगटन सुंदर आणि सौरभ कुमार. 

आणखी वाचा :

पाटीदार की सरफराज खान, प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी मिळणार? बॅटिंग कोच विक्रम राठौड यांचं मोठं वक्तव्य



[ad_2]

Related posts