Mumbai Railway Budget 2024 : अर्थसंकल्पातून रेल्वे प्रवाश्यांना काय मिळालं?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अर्थमंत्री निर्माला सिमारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प गुरुवार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर करण्यात आला. तसेच यावेळी रेल्वेच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला  15 हजार 554 कोटी  रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मुंबईकर प्रवाश्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट हाती घेण्यात आलेत. यापैकी एमयुटीपी 1 पूर्ण झाला असून  2, 3 आणि 3 ए बाकी आहेत. यामध्ये जितके पैसे रेल्वे देणार आहे, तितकेच पैसे राज्य सरकार देखील देखील एमआरव्हीसीला देणार.

एमयूटीपी दोन प्रकल्पला 100 कोटी मिळाले आहेत. यामध्ये जवळपास सर्व प्रकल्प पूर्ण झाले असून काही प्रकल्पांची थोडी कामे बाकी आहेत. तसेच उर्वरित प्रकल्प हे पूर्ण होतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला या 5 आणि 6 व्या मार्गिकेसाठी तरतूद करण्यात आलीये. तसेच मुंबई सेंट्रल ते बोरीवली या सहाव्या मार्गिकेसाठी देखील काम सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पांविषयी आणि मिळालेल्या निधींविषयी सविस्तर जाणून घेऊयात

एमयूटीपी 2 प्रकल्पाला 100 कोटी मिळाले

  • सी एस एम टी ते कुर्ला 5 वी आणि 6 वी मार्गिका
  • मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावी मार्गिका

एमयुटीपी 3 प्रकल्पाला 300 कोटी मिळाले

  • विरार डहाणू मार्गाचे चौपदरीकरण
  • पनवेल कर्जत नवीन रेल कॉरिडॉर 
  • ऐरोली कळवा नवीन उन्नत मार्ग
  • नवीन लोकल गाड्या (नॉन एसी)
  • रुलांवरील अपघात रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

एमयूटीपी 3 ए प्रकल्पाला 388 कोटी मिळाले

  • गोरेगाव पासून बोरवली पर्यंत हार्बर मार्गाचा विस्तार
  • बोरवली आणि विरार दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिक
  • कल्याण आणि बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका 
  • कल्याण यार्ड रीमॉडलिंग
  • सीएसएमटी ते पनवेल, सीएसएमटी ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार दरम्यान सीबीटीसी तंत्रज्ञानावर आधारित रेल्वे गाड्यांचे परिचालन 
  • विविध स्थानकांचे रीडेव्हलपमेंट
  • मुंबईकर प्रवाशांसाठी नवीन एसी लोकल 


हेही वाचा

थीम पार्कसाठी महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकर जागेसाठी बीएमसीच्या बोलीला मंजुरी

[ad_2]

Related posts