Kalyan Crime News Kalyan Police FIR filed against former BJP Corporator Kalyan West in harassment cheating of woman

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kalyan Crime News :  कल्याणमधील (Kalyan) भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी नगरसेवक आणि  बांधकाम विकासक मनोज रामशकल राय यांच्या विरोधात एका 40 वर्षीय महिलेने बलात्काराचा आणि लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kalyan Kolsewadi Police Station) या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण पूर्वेतील राय रेसिडेन्सी गृह प्रकल्पाचे मनोज राय हे मुख्य प्रवर्तक आहेत. गृहिणी असलेल्या 40 वर्षाच्या तक्रारदार पीडित महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, सन 2015 ते मे 2022 या कालावधीत भाजपचे माजी नगरसेवक मनोज रामशकल राय यांनी आपणास लग्नाचे आमिष दाखवले. या आमिषातून त्याने आपल्या राहत्या घरी येऊन वेळोवेळी आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले. या शारीरिक संबंधांमुळे मनोज राय यांच्यापासून आपण चारवेळा गर्भवती राहिलो. आपल्या इच्छे विरूध्द हा सगळा प्रकार मनोज राय यांनी केला असल्याची तक्रार पीडितेने केली आहे. गर्भवती राहिल्यानंतर चार वेळा आरोपी राय यांनी आपणास दमदाटी, शिवीगाळ, मारझोड आणि धमकी देऊन गर्भपात करण्यास जबरदस्तीने भाग पाडले असल्याचा आरोप पीडितेने केला.

या प्रकरणाची कोठेही वाच्यता करू नये म्हणून आपणास सतत मारहाण केली जात होती. आता हा सगळा प्रकार असह्य झाल्याने आणि आपणास लग्नाचे आमिष दाखवूनही ते मागील नऊ वर्षाच्या कालावधीत न पाळल्याने आपण ही तक्रार माजी नगरसेवक मनोज राय विरोधात तक्रार करत असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

पीडितेच्या तक्रारीनंतर राय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाट यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन  माजी नगरसेवक मनोज राय यांच्यावर भादवि कलम 376,(2) ,313,323,504 आणि 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मनोज राय हे  फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. तर,  या प्रकरणाच्या अधिक माहितीसाठी माजी नगरसेवक तथा विकासक मनोज राय यांना सतत भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद येत होता.

दरम्यान, यापूर्वीही ऑगस्ट 2020 मध्ये एका जमिनीच्या वादातून कुटूंबासह जमीन मालकाला हाणामारी केल्याप्रकरणी  भाजप नगरसेवक मनोज राय कोळसेवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यावेळीही  राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts