India Have Won The Toss And They Have Decided To Bat First Rajat Patidar Kuldeep Yadav And Mukesh Kumar Replace KL Rahul Jadeja And Siraj

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India Playing 11 Vs England for 2nd Test Match:  रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध (England) 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना आजपासून (2 फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने पडला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पाहुणा इंग्लंडचा संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात आलाय. विशाखापट्टनमची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असल्याचं बोलले जातेय. 

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांपासून खेळवला जाईल. याआधी हैदराबादमध्ये मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात आला होता, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाला अवघ्या 4 दिवसांत 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. अशाप्रकारे इंग्लंड संघानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती.

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, केएस भरत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) 

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ – 

जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.  

सिराज संघाबाहेर का ?

इंग्लंडविरुद्ध विझाग येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीसाठी मोहम्मद सिराजला भारतीय संघातून मुक्त करण्यात आले आहे. इंग्लंडविरोधातील मालिकेचा कालावधी आणि अलीकडच्या काळात सिराजने खेळलेले क्रिकेट पाहाता त्याला आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकोट येथे होणऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सिराज उपलब्ध असेल. आवेश खान दुसऱ्या कसोटीसाठी संघात पुन्हा सामील झाला आहे.

गिल आणि श्रेयस खराब फॉर्मात 

शुभमन गिलनं गेल्या 6 कसोटी सामन्यांतील 11 डावांत एकदाही फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. गिलला अर्धशतकापर्यंतही मजल मारलेली नाही. त्याचं अर्धशतक मार्च 2023 मध्ये आलं होतं. तेव्हा त्यांनं ऑस्ट्रेलिया विरोधात अहमदाबाद कसोटीत 128 धावांची खेळी खेळली होती. तर श्रेयस अय्यरनं गेल्या 6 कसोटी सामन्यांतील 10 डावांपासून एकही अर्धशतक झळकावलेलं नाही. त्यानं शेवटी 12 डिसेंबर 2022 मध्ये अर्धशतक झळकावलं होतं. तर बांगलादेश विरोधातील मीरपूर कसोटीत पहिल्या डावांत 87 धावा केल्या होत्या.  



[ad_2]

Related posts