IND vs AUS WTC Final Day 3 Gives India To Hope Of Victory ; WTC Final चा तिसरा दिवस भारताचा, पाहा कोणत्या गोष्टींमुळे दिसली विजयाची आशा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन : विश्व अजिंक्यपद फायनलचा तिसरा दिवस कुठेतरी भारतासाठी आशादायक दिसला. पहिले दोन्ही दिवस ऑस्ट्रेलियाने गाजवले होते. त्यामुळे तिसऱ्या दिवशी भारतावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली होती. पण भारताने तिसऱ्या दिवशी चांगला खेळ केला आणि त्यामुळेच आता त्यांना विजयाची आशा निर्माण झाली आहे. भारताचा पहिला डाव २९६ धावांवर आटोपला आणि त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येवर अंकुश लावला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या दिवशी वरचष्मा राखता आला नाही.तिसऱ्या दिवसासाठी भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कारण भारताटा यष्टीरक्षक भरत हा लवकर बाद झाला. पण त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर या मुंबईकरांनी मैदान गाजवले. यावेळी शार्दुलला तब्बल तीन वेळा जीवदान मिळाले, तर अजिंक्यला आज पुन्हा एक जीवदान लाभले. या गोष्टींचा चांगलाच फायदा अजिंक्य आणि शार्दुल यांनी उचलला. अजिंक्यने यावेळी उपहारापर्यंत ८९ धावा केल्या होत्या, यामध्ये ११ चौकारांसह एका षटकाराचाही समावेश होता. त्यामुळे उपहारापर्यंत भारताने चांगली मजल मारली होती आणि भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येच्या किती जवळ जाणार, याची चर्चा सुरु झाली होती. पण त्यानंतर भारताला मोठा धक्का बसला तो अजिंक्यच्या रुपात. ऑफ स्टम्पच्या बाहेरील फटका मारण्याची चूक त्याने केली आणि त्यामुळे तो बाद झाला. यावेळी अजिंक्यचे १३ वे शतक पाहता आले असते पण त्यासाठी त्याला ११ धावा कमी पडल्या, त्यामुळे आता दुसऱ्या डावात त्याच्याकडून संघाला मोठ्या आशा असतील.

अजिंक्य बाद झाला आणि त्यानंतर शार्दुलने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. शार्दुलने यावेळी अर्धशतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला. पण त्याला अर्धशतकानंतर जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. कारण ५१ धावांवर बाद झाला. त्यानंतर काही वेळातच भारताचा पहिला डाव २९६ धावांत संपुष्टात आला.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

ऑस्ट्रेलियाला भारताने डेव्हिड वॉर्नरच्या रुपात पहिला धक्का दिला. वॉर्नरला यावेळी एकच धाव करता आली. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांंनी टिच्चून गोलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. त्यामुळे सध्याच्या घडीला हा सामना एकतर्फी नसून भारतालाही या सामन्यात आला विजयाची आशा दिसत आहे. अजिंक्य आणि शार्दुल यांची दमदार खेळी व त्यानंतर अचूक गोलंदाजी हे या तिसऱ्या दिवसाची खासियत ठरली. त्यामुळे आता भारतही विजय मिळवू शकतो, अशी आशा त्यांच्या चाहत्यांना आहे. तिसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाची ४ बाद १२३ अशी स्थिती असून त्यांच्याकडे २९६ धावांची आघाडी आहे. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक दोन बळी मिळवले.

[ad_2]

Related posts