Legends League Cricket India Capitals Vs Gujrat Giants India Capitals Won Toss Elected Field( प्रगत भारत । pragatbharat.com)

LLC 2022, India capitals vs Gujrat Giants : लीजेंड्स लीग क्रिकेटच्या (Legends League Cricket 2022) दुसऱ्या हंगामाला आता सुरुवात झाली आहे.  कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर  इंडिया कॅपिटल्स (India Capitals) आणि गुजरात जायंट्स (Gujrat Giants) हे दोन संघ एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. नाणेफेकीनंतर इंडिया कॅपिटल्स संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे इंडिया कॅपिटल्स संघाचं नेतृत्त्व जॅक कॅलिसकडे आलं आहे. गौतम गंभीर सामन्यात नसल्यामुळे जॅकवर ही जबाबदारी आहे. 

कसे आहेत दोन्ही संघाचे अंतिम 11?

गुजरात जायंट्स:

वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), केविन ओब्रायन, पार्थिव पटेल, मनविंदर बिस्ला, थिसारा परेरा, यशपाल सिंह, रयाद एमरित, ग्रीम स्वॅन, अशोक डिंडा, केपी अपन्ना, मिचेल मॅक्लाघन. 

इंडिया कॅपिटल्स :

जॅक कॅलिस (कर्णधार), सोलोमोन मायर, हॅमिल्टन मसकदाजा, दिनेश रामदिन, अॅश्ले नर्स, सुहेल शर्मा, लियाम प्लकेंट, मिचेल जॉन्सन, पकंज सिंह, पवन सुयाल, रजत भाटीया

सलामीचा खास सामना इंडिया महाराजाने जिंकला

लीजेंड्स लीग क्रिकेटच्या (Legends League Cricket 2022) सामन्यांना आज सुरुवात होत असली तरी शुक्रवारी (16 सप्टेंबर) एक खास सामना पार पडला. यावेळी जगभरातील माजी दिग्गज खेळाडू आणि भारताचे माजी दिग्गज खेळाडू आमने-सामने आले होते.  इंडिया महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स (India Maharajas vs World Giants) यांच्यात पार पडलेल्या या सामन्यात इंडिया महाराजाने 6 गडी राखून विजय मिळवला. यावेळी भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर तसंच जगभरातील निवडक माजी दिग्गज क्रिकेटर मैदानात उतरल्याचे दिसून आलं. सामन्यात भारताचे माजी क्रिकेचर युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी नाबाद खेळी केली तर पंकज सिंहने 5 विकेट्स घेत कमाल केली. 

हे देखील वाचा- Related posts