Pune news accident in savitribai phule Pune University chowk Mass traffic congestion

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात अपघाताचं प्रमाण आणि वाहतूक (Pune Accident) कोंडीचं प्रमाण सातत्याने वाढत आहे.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक राजभवनजवळ मालवाहू ट्रेलर उलटला आहे. ब्रेमेन चौकातून येणारी वाहतूक काही बोपोडीच्या दिशेने वळवण्यात आली आहे.  ट्रेलर उलटल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

गणेश खिंड रस्त्यावरील विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी महाराज चौक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामासाठी आलेला मालवाहू ट्रेलर राजभवनजवळ चतु:शृंगी पोलिस ठाण्यासमोर युटर्न घेताना उलटला. पहाटेच्या चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे ब्रेमेन चौकातून विद्यापीठासमोरून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बोपोडीमार्गे वळविण्यात आली आहे. या घटनेमुळे दररोज सकाळी विद्यापीठ चौकासमोर होणाऱ्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे.

 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts