Gopichand Padalkar : “हा लढा भुजबळ, पडळकरांसाठी नव्हे तर ओबीसींवर घाला घालणाऱ्यांविरोधात”; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

OBC Mahaelgar Melava अहमदनगर : येथील क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर आज (दि. 03) ओबीसींचा (OBC) महाएल्गार मेळावा दुपारी तीन वाजता पार पडत आहे. या मेळाव्यात ओबीसी नेते गोपीचंद पडळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. हा लढा भुजबळ, पडळकरांसाठी नाही तर ओबीसींवर घाला घालणाऱ्यांविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

गोपीचंद पडळकर म्हणाले की, या जिल्ह्यात ज्या माऊलीने जन्म घेतला, त्यांनी साम्राज्य निर्माण केले. सत्ताधारी जर माजले असतील तर ती सत्ता हिसकावून घ्या,असे अहिल्याबाई होळकर म्हणत होत्या. आता कोणतीही भीती मनात ठेऊ नका. भुजबळ यांच्या मागे सर्वांनी उभे राहा. एकटा भुजबळ नाही, आम्ही सर्व आहोत. ओबीसींचा हक्क घेतात तुम्हाला तुमची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही.  

देश स्वतंत्र झाल्यानंतर मतदारसंघ आरक्षण

ते पुढे म्हणाले की, 1932 मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदारसंघ आरक्षण द्या असे म्हटले. गांधी यांनी उपोषण सुरू केले. झुंडच्या झुंड उपोषणला बसल्या. देश स्वतंत्र झाल्यानंतर अनुसूचित जाती आणि जमाती असे मतदारसंघ आरक्षण देण्यात आले. 

…तर सेम टू सेम रोहित पवार दिसला असता

राजा का बेटा राजा नाही बनेगा, असे अहिल्याबाई होळकर यांनी सांगितले आहे. रोहित पवार नावाचं जातीयवादी नेतृत्व या जिल्ह्यात आहे. हे पार्सल तुम्ही बारामतीला पाठवणार का नाही? जातीयवादाचा चेहरा असता तर सेम टू सेम रोहित पवार दिसला असता, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. 

आम्ही आमदार आणि खासदारकी घेऊ

त्यांच्या अंगात रक्त नाही जातीयवाद वाहतो आहे. ओबीसींचे आरक्षण म्हणजे खीर आहे का? कोणाला चॅलेंग करायचं करा तुम्ही आमच्या सरपंच, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर डोळा ठेवला आहे. तुम्ही आमचे सरपंच घ्या आम्ही आमदार आणि खासदारकी घेऊ, असेही त्यांनी म्हटले.

अधिसूचना काढून सरकारने घोडचूक केलीय

नवीन शब्द आला सगेसोयरे, आधी पैसे देऊन बोगस सर्टिफिकेट घेतले जात होते. ओबीसीच्या आरक्षणावर हात लावत नाही, तर संविधानाचा ढाचा जेसीबीने उधळून लावला जात आहे. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले जात असताना सगेसोयरे हे नवीन आहे. अधिसूचना काढून सरकारने घोडचूक केलीय. मागास नसलेला मराठा समाज मागास नसलेल्या कुणबी समाजाचा सजातीय कसा असू शकतो? असा सवाल यावेळी गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा 

Prakash Shendge : “जरांगेंची फसवणूक केली की मराठा समाजाची, सरकारने उत्तर द्यावं”; ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून प्रकाश शेंडगे कडाडले

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts