Gopichand Padalkar : “रोहित पवारांच्या अंगात रक्त नाही तर जातीयवाद वाहतोय”; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gopichand Padalkar on Rohit Pawar : मागील चार दिवसांपूर्वी  छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर आरक्षणासाठी एका युवकाने आत्महत्या केली. या युवकाकडे रोहित पवारांचा एकतरी प्रतिनिधी गेलाय का? मराठा आरक्षणाचा प्रश्न आल्यावर सर्वात आधी आझाद मैदानावर रोहित पवार गेले, हा प्रश्न पेटवावा म्हणून तुम्ही तिथे हजर राहिलात. म्हणून रोहित पवारांच्या अंगात रक्त वाहत नाही तर जातीयवाद वाहतोय, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. अहमदनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

गोपीचंद पडळकर म्हणाले की, राज्यातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर देखील मांडली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने आता सर्व लढाईसाठी तयार राहिले पाहिजे. 

धनगर आरक्षणाचा निर्णय कोर्टातून लागेल

धनगर आरक्षणाबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक करून आलो. धनगर आरक्षणाची 12 फेब्रुवारी तारीख ही अंतिम तारीख आहे. उच्च न्यायालयाने काही प्रश्न विचारले आहे. त्याची उत्तर 12 तारखेला द्यायचे आहे. आम्ही जवळपास 150 पेक्षा जास्त पुरावे दिलेले आहेत. या महिन्यात धनगर आरक्षणाचा निर्णय कोर्टातून लागेल,  असं गोपीचंद पडळकर यांनी म्हंटले आहे.

राजीनामा मागणाऱ्यांना ही चपराक

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 17 नोव्हेंबरला झालेल्या ओबीसी मेळाव्याच्या पूर्वीच आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत विचारले असता गोपीचंद पडळकर म्हणाले की, छगन भुजबळ यांना राजीनामा मागणाऱ्यांना ही चपराक आहे. 

अधिसूचना काढून सरकारने घोडचूक केली

ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून गोपीचंद पडळकर यांनी तोफ डागली. ते म्हणाले की, नवीन शब्द आला सगेसोयरे, आधी पैसे देऊन बोगस सर्टिफिकेट घेतले जात होते. ओबीसीच्या आरक्षणावर हात लावत नाही, तर संविधानाचा ढाचा जेसीबीने उधळून लावला जात आहे. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले जात असताना सगेसोयरे हे नवीन आहे. अधिसूचना काढून सरकारने घोडचूक केलीय, अशी टीका त्यांनी केली आहे.

…म्हणजे मनोज जरांगेंना पितामहची पदवी मिळेल – प्रकाश शेंडगे

मनोज जरांगे यांनी आता असे एक उपोषण केलं पाहिजे की, उभ्या भारतातल्या शेतकऱ्यांना कुणबी दाखले द्या. म्हणजे संपूर्ण देश हा कुणबीमध्ये (Kunbi) जाईल आणि मनोज जरांगे यांना पितामहची डिग्री मिळेल, असा टोला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला. 

आणखी वाचा 

Chhagan Bhujbal : मी 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणाले वाच्यता नको; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts