Ramdas Kadam News Ramdas Kadam Criticizes Aaditya Thackeray( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ramdas Kadam on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray यांनाच शंभर खोके घ्यायची सवय असल्याचा आरोप शिंदे गटातील शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या शंभर खोक्यांची पोलोखोल करणार असल्याचे देखील कदम म्हणाले. आज दापोली इथे शिंदे गटाची जाहीर सभा आयोजीत केली आहे. या सभेत आदित्य ठाकरेंच्या शंभर खोक्यांची पोलोखोल करणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.
 
गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होताना दिसत आहे. दोन्हीकडचे नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच आता शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी थेट  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरट टीका केली आहे. शंभर खोके घ्यायची सवय कोणाला आहे, याची पोलखोल आजच्या दापोली येथील शिवसेनेच्या जाहीर सभेत करणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे. यावेळी रामदास कदम यांनी शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा ‘चिपळूणचा नाच्या’ असा उल्लेख करत त्यांच्यावरही जोरदार टीका केली. 

 

 

Related posts